Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिककोलाजWeekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ मार्च २०२४

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ मार्च २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ मार्च २०२४

समस्या सुटतील
मेष :
धार्मिक प्रवासाची योजना आखाल. त्यासाठी खर्चात वाढ होईल. सर्व कुटुंबाचा सहभाग आनंद देणारा ठरेल. दानधर्मासाठी खर्च कराल. जोडीदाराच्या सहकार्यासाठी पूरक राहा. उद्योग-व्यवसायासाठी विशेष श्रम घेतल्यास नियोजन यशस्वी झालेली दिसेल. परदेश प्रवासाची संधी. परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. कुटुंब व परिवारातील वातावरण सुखद राहील. आरोग्यविषयी फारशी चिंता नसेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होऊ शकतात. दुरावलेले मित्र पुन्हा जवळ येऊ शकतात. गूढ शास्त्राच्या अभ्यासात प्रगती साधाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. शुभ समाचार मिळतील. नव्या योजना अमलात आणू शकाल. काही कारणास्तव केलेले प्रवास सफल होतील.
परोपकारी वृत्ती राहील
वृषभ :
आपल्या कार्यक्षेत्रात पद, अधिकार, प्रतिष्ठा, सन्मान, प्रसिद्धी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. परोपकारी वृत्ती राहील. सर्वांना मदतीचा हात द्यावा. प्रसिद्धीचे योग आहेत. धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल. समाजातील सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन त्या जोरावर मदत मिळेल. प्रसिद्धीचे योग आहेत. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. बेरोजगारांना रोजगार मिळतील. नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी मिळू शकते. पण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक आहे. कुटुंब-परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. व्यवसाय-धंद्यात परदेशी संबंध येऊ शकतो. आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, चोरीची किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण सुखद राहील.
कामे सफल होतील
मिथुन :
सध्याचे ग्रहमान प्रगतीसाठी तसेच उन्नतीसाठी अनुकूल राहील. उद्योग व्यवसायात धडाडीने काम कराल. अपेक्षित पत्रव्यवहार घडेल. नव्या व्यवहारात उत्तम प्रगती साधू शकाल. नोकरीतही कर्तृत्वाची साथ लाभेल. आपले कार्यकौशल्य कौतुकास्पद असेल. संततीची अभ्यासात प्रगती झालेली बघून समाधान वाटेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीतून फायदा होण्याचा संभव. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. मात्र कुसंगत टाळावी. वैवाहिक सौख्यात कुरबुरी चालू राहतील. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चात वाढ होईल. कोर्टकचेरी कामात लक्ष द्यावे लागेल. शत्रूंच्या कारवाया चालू राहतील. युक्तीने त्यावर विजय संपादित करू शकाल. आपली बहुतेक क्षेत्रातील कामे सफल होतील.
अप्रिय निर्णय स्वीकारावे लागतील
कर्क :
काही वेळेस काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडतील आणि काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागतात. आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडल्याने येणाऱ्या काळासाठी आपण मनात साशंक असाल. व्यवसाय-धंद्यासंबंधी काही समस्या असून त्या सोडवण्यासाठी आपल्याकडून फारसे काही होत नाही असे वाटेल; परंतु आपण आपल्या बुद्धी कौशल्य, आत्मविश्वास व परमेश्वरावर विश्वास ठेवून या परिस्थितीशी दोन हात करू शकता. यश आपलेच आहे. धिम्यागतीने परिस्थितीत सुधारणा होऊन सफल व्हाल. सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्या. भावंडे, नातेवाईक यांचा सहवास व प्रेम मिळेल. कुटुंबातून सहकार्य प्राप्त होईल. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्या. प्रतिष्ठा वाढेल.
उत्साही व हरहुन्नरी राहाल
सिंह :
उद्योग-व्यवसायातील अडीअडचणींवर मार्ग काढण्यात यश मिळेल. मार्गदर्शन मिळेल, मदत मिळेल. त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करू शकाल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. उत्साही व हरहुन्नरी राहाल. जास्तीचे कष्ट घेण्याची तयारी असेल. नवीन आव्हाने स्वीकाराल आपलीच आहे. जिद्द व चिकाटीने पुढे नेत मार्गक्रमण कराल. आपल्या कार्यशैलीची प्रशंसा होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे श्रमही वाढणार आहेत. उत्पन्न वाढेल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढलेली दिसेल. आपापसातील संबंध व नाती चांगली राहतील. प्रगती झाल्याने आपण आनंदी राहाल.
अनुकूल ग्रहमान
कन्या :
कुटुंबात शुभकार्य होण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबात मंगलकार्ये वा शुभ कार्य घडतील. वातावरण आनंददायक राहील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सूचनांचा आदर आपण कराल. विविध खरेदी होईल. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. विविध वस्त्रालंकार यासाठी खर्च होईल. सर्वांच्या मागण्या पूर्ण कराल. खर्च वाढला तरी विविध मार्गांतून धनआगमन होईल. मुलांची विशेष काळजी घ्या. इतरांनी आपले काम करावे ही अपेक्षा बाळगू नका. प्रलंबित कामे लवकर सोडवणे गरजेचे. त्यासाठी आपणास कुठेतरी सुरुवात करणे आवश्यक. सकारात्मक राहा.
प्रयत्नशील राहाल
तूळ
:
या दिवसांत काही दिवस आपणासाठी सुखकारक असणार आहे. आपणाला आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण चांगले दिसावे यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, त्यासाठी उपाययोजना कराल. अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरातील काही व्यक्तींच्या वागण्याने आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. त्या व्यक्तीशी बोलून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने हे दिवस आपणाला उत्तेजना पूर्ण असतील. नवीन उपक्रम, उद्योग हे आकर्षक व योग्य फायदा मिळण्यासाठी आशादायी असतील. आपणाला आपल्या जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळणार आहे.
सुवार्ता समजतील

वृश्चिक : कुटुंब-परिवारातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर सुवार्ता समजतील. त्यांचे अभ्यास व खेळ क्षेत्रात चांगली प्रगती होईल. शिक्षण नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळून उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. त्याकामी गुरुजन तसेच इतरांची मदत मिळू शकते. कुटुंबामध्ये एखाद्या धार्मिक कार्य होऊ शकते. त्यासाठी खर्च होईल. आप्तेष्ट-नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील. नोकरी-व्यवसाय-धंद्यानिमित्त मोठे प्रवास घडू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर सत्कार होईल; परंतु लहान-सहान कारणांवरून वाद-विवाद टाळावेत.

विविध मार्गांनी धनलाभ
धनु : आर्थिक स्थिती मजबूत राहील. विविध मार्गांनी धनलाभ होतील. मालमत्तेची कामे फायद्यात राहतील. आर्थिक लाभ संभवतो. विविध मार्गांनी धनलाभ होईल. व्यवसायात महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. नवीन करार होऊ शकतात. जुनी येणी वसूल होतील. मात्र वसुली करताना वाद-विवाद सांभाळा. थोडी काळजी घेणे आवश्यक राहील. कुटुंबात वातावरण चांगले राहील. जीवनसाथीची साथ मिळेल. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. नोकरीत बदलीची किंवा कामात बदल होण्याची शक्यता. आपल्या मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील.
आर्थिक फायदे होतील
मकर :
नोकरी-व्यवसाय-धंद्यानिमित्त जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक राहील. आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा तसेच आपले वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. भावंडांच्या भेटीगाठी होऊ शकतील. कुटुंबातील वातावरण सर्वसामान्य राहील. काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मुलांकडून अपेक्षा भंग होण्याची शक्यता. आपण शांतपणे निर्णय घेऊन वेळ पडल्यास मुलांशी चर्चा करून समस्या सोडवू शकाल. मुलांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास टाळा. आर्थिक फायदे होतील. स्थावर संपत्तीविषयीचे थांबलेले व्यवहार गतीमान होतील. आर्थिक फायदा होऊ शकतो.
बदलीची तयारी ठेवा
कुंभ :
कौटुंबिक सौख्यासाठी आपणास हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास आपणास खरे समाधान मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आपल्याला समाधान लाभेल. आपल्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. कुटुंबात आपल्या मताला प्राधान्य दिले जाईल. आपले निर्णय योग्य ठरतील. नोकरी-व्यवसायात आपण याअगोदर केलेल्या कामाचे फळ मिळेल. पदोन्नती, वेतनवृद्धीचे योग आहेत. मात्र बदलीची तयारी ठेवा. वरिष्ठ आपल्या कामावर खूश राहतील. एखादी विशेष प्रकारची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसायातील रखडलेली रक्कम वसूल होईल.
राग आवरणे हितकारक ठरेल

मीन :  आपल्या क्षेत्रात इतरांचे सहकार्य मिळाल्यामुळे आपली कामे लवकर पूर्ण होतील. जमीन-जुमला, स्थायी संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती इ.विषयक थंडावलेले व्यवहार पुन्हा गतिशील होतील. ओळखी-मध्यस्थींचा उपयोग होईल. आपल्याला आपली सहनशक्ती वाढवणे गरजेचे ठरेल. आपला राग आवरणे हितकारक ठरेल. कोणाचाही अपमान करू नका अथवा अपमानास्पद वागणूक देण्याचे टाळा. विद्यार्थ्यांनी इतरत्र वेळ वाया घालवू नये तसेच अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. आर्थिक व्याप्ती वाढेल. नवीन करार-मदारांची शक्यता. व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करावे लागतील. प्रवास कार्यसिद्ध राहतील. नवी व्यावसायिक नाती जुळू शकतात. अनावश्यक खर्च टाळा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -