Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीPalghar adiavsi : सिमेंटच्या जंगलात पालघरचे आदिवासी जपतायत बहुमोल संस्कृती आणि परंपरा

Palghar adiavsi : सिमेंटच्या जंगलात पालघरचे आदिवासी जपतायत बहुमोल संस्कृती आणि परंपरा

कशी करतात दिवाळीची तयारी?

मोखाडा : आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आदी ग्रामीण भागात आज ही पारंपरिक रिती रिवाज व पिढी जात परंपरांचे जतन केले जात आहे. आधुनिकतेच्या काळात सर्वत्र टोले जंग इमारती, आलिशान घरांना संगमरवरी, रंगी बेरंगी फरशी, मार्बल स्टाईलचे जंगल जगभर निर्माण झालेले असतानाही जव्हार, मोखाड्यासारख्या आदिवासी बहुल भागात आजही दिवाळी सण सुरू व्हायच्या अगोदर या भागातील महिला, नागरिक आपल्या घरात आणि घराबाहेरील मोकळे अंगण मुरुमाच्या साहाय्याने चोपून शेणामातीने सारवून घेतात.

आदिवासी भागातील रोजगार आणि उपजिविकेचे दुर्भिक्ष बघता कुटुंबांच्या दोनवेळच्या पुरेशा उदरनिर्वाहाची मारामारी असणाऱ्या बहुसंख्य आदिवासी कुटुंबांची घरे व घरासमोरील अंगणातील मोकळी जागा आज ही मुरुमाने चोपल्यानंतर शेणाने सारवली जाते. गावालगत असलेला मुरुम खड्डेदार चिकट माती आणल्यानंतर पूर्वीच्या मातीच्या भरावाचे वरवर खोदकाम करुन त्याच्यावर पुरेपूर पाणी टाकले जाते. एकदा का पूर्वीचा मुरुम चिंब भिजला की त्याच्यावरुन नवीन मुरुमांचा पसारा दिला जातो. यानंतर लाकडापासून बनविलेल्या दीड फूट लांब आणि तीन-चार इंच रुंद तसेच वरुन खाली उताराच्या स्वरुपाचे पिटणे चोपण्या च्या साहाय्याने ओला चिंब झालेल्या मुरुमावर जोराने चोप देऊन मुरुम बसविला जातो. असे तीन चार वेळा झाल्यानंतर त्यावरुन शेणाचे सारवण दिले जाते. पुन्हा एकदा दोन चार वेळा चोप देऊन घराचे अंगण किंवा घर मुरुमाने चकचकीत चोपडे बनवले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -