Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीSwine flu : मुंबईत स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढतेय!

Swine flu : मुंबईत स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढतेय!

मुंबई : मुंबईत डेंग्यू, लेप्टोचा धोका वाढत असताना ऑगस्टमध्ये पहिल्या वीस दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या (Swine flu) १०० रुग्णांची नोंद झाली आहे. एच१ एन१ रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढ चिंताजनक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मुंबईकरांमध्ये घसादुखी, सर्दी, खोकला, ताप आणि अनेकदा तीव्र स्वरूपाचा ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे व्हायरल, डेंग्यू किंवा मलेरिया यापैकी कोणत्याही आजाराचे निदान न झाल्यास स्वाइन फ्लूच्या आजारासाठीही निदान चाचण्या करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोरोनाच्या कालावधीमध्ये स्वाइन फ्लूच्या आजाराचा जोर कमी होता. यंदा मात्र पावसाळ्यामध्ये साथींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच स्वाइन फ्लूची रूग्णसंख्या काहीशी वाढताना दिसते आहे.

१ ते २० ऑगस्ट दरम्यानची रुग्णसंख्या

  • मलेरिया – ७०४
  • लेप्टो -२१७
  • डेंग्यू – ४९५
  • गॅस्ट्रो – ४९५
  • कावीळ – ६६०
  • चिकनगुनिया – १४
  • एच१एन१ – १०६
  • जुलै २०२३
  • मलेरिया – ७२१
  • लेप्टो – ४१३
  • डेंग्यू – ६८५
  • गॅस्ट्रो – १७६७
  • कावीळ – १४४
  • चिकनगुनिया – २७
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -