Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सSurabhi Hande: सुरभीचा म्हाळसा ते संघर्षयोद्धा प्रवास

Surabhi Hande: सुरभीचा म्हाळसा ते संघर्षयोद्धा प्रवास

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल

सुरभी हांडे नावाच्या अभिनेत्रीचा ‘संघर्षयोद्धा’ हा नवीन चित्रपट येणार आहे. त्यामध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सुरभी हांडेचा जन्म नागपूरमधील भंडारा तालुक्यात झाला. तिचे वडील जळगावमधील आकाशवाणीवर संगीतकार म्हणून कामाला होते. तिचे बारावीपर्यंत शिक्षण जळगांवला झाले. आई शास्त्रीय गायिका व कॉलेजमध्ये शिकवायला होती.

शालेय जीवनात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत तिने भाग घेतला होता. जळगावात होणाऱ्या अनेक कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. आई-वडिलांचा पाठिंबा मिळाल्याने, तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढला होता. नागपूरला सायकोलॉजीमध्ये तिने पदवी प्राप्त केली. नागपूरला तिने गाण्याच्या परीक्षा दिल्या. गाण्यामध्ये ती विशारद आहे. कथ्थक नृत्यदेखील ती शिकली आहे.

तिचे वडील आकाशवाणीत संगीतकार होते. त्यामुळे अनेक गायक, दिग्दर्शक यांच्याशी त्यांचा घरोबा असायचा. त्यावेळी दिग्दर्शक संजय सुरकर ‘स्टँड बाय’ नावाचा हिंदी सिनेमा तयार करीत होते. त्यातील महाराष्ट्रीयन मुलीच्या भूमिकेसाठी सुरभिची वर्णी लागली. हा तिच्या जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट ठरला. पदवीचे शिक्षण संपण्याच्या वेळी तिला.‘स्वामी’ हे महानाट्य मिळाले. संजय पेंडसे त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकाचे भारतभर प्रयोग झाले.

स्वामी विवेकानंदांवर हे नाटक होते. त्यात मार्गारेट नोबेलची भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर स्मिता ठाकरे प्रोडक्शनतर्फे तिला ‘आंबट गोड’ नावाची मालिका मिळाली. त्यानंतर तिला कोठारे विजनकडून ‘जय मल्हार’ मालिकेसाठी विचारण्यात आले. त्याचवेळी स्टार प्रवाहवरील ‘रूंजी’ मालिकेसाठी देखील तिला विचारण्यात आले होते. त्यामुळे ती गोंधळून गेली होती, पुढे काय करायचे. कोणत्या मालिकेमध्ये काम करायचे म्हणून? तिने झी टीव्हीवरील ‘जय मल्हार’ मालिकेची निवड केली. या मालिकेत तिने साकारलेली म्हाळसाची भूमिका खूपच लोकप्रिय झाली. आजदेखील लोक तिला म्हाळसा या व्यक्तिरेखेने ओळखतात. हे खरं तर ती मालिका व भूमिका यांची देण आहे. त्यानंतर तिचे जेजुरीला जाणं झाले. तिथे म्हाळसा देवीच दर्शन घेतल्यावर, तिला भरून आले. त्यानंतर तिने ‘भुताटलेला ‘ही वेबसीरिज केली. नेटफ्लिक्सवर ‘अगं बाई अरे चा २’आणि ‘ताराराणी’ हे चित्रपटदेखील केले.

आता तिचा ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट येतोय. या चित्रपटाची कथा मनोज जरांगे पाटील यांची आहे. त्यांच्या पत्नीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये ती आपल्याला पाहायला मिळणार आहे.

पत्नीचा मिळालेला पाठिंबा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल, तिच्या पाठिंब्यामुळेच जरांगे पाटील समाजामध्ये काम करू शकले, समाजासाठी लढू शकले. आता सध्याची जी परिस्थिती चालू आहे, त्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यात एका पत्नीचा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तिला अभिनय करण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिल्याचे तिने सांगितले, या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप चांगली होती. त्यामुळे एक वेगळीच भूमिका तिला साकारण्याची संधी मिळाली. सुरभीला तिच्या आगामी ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटसाठी हार्दिक शुभेच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -