Friday, May 17, 2024
Homeक्रीडाIPL 2024SRH vs RR: भुवनेश्वरच्या गोलंदाजीपुढे राजस्थान फेल, हैदराबादचा १ रनने रोमहर्षक...

SRH vs RR: भुवनेश्वरच्या गोलंदाजीपुढे राजस्थान फेल, हैदराबादचा १ रनने रोमहर्षक विजय…

SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन. हैदराबादचा आक्रमक सलामीवीर ट्रेव्हिस हेडने ५८ धावांची खेळी केली. नितीश रेड्डी या युवा फलंदाजांनी सर्वाधिक ७६ धावांची नाबाद खेळी केली. तर यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन याने ४२ धावांचं योगदान दिलं. त्याआधी अनमोलप्रीतसिंह ५ धावा करुन माघारी परतला. तर अभिषेक शर्मा याने १२ धावा जोडल्या. तर  राजस्थाकडून आर अश्विन याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

नितीश रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन या जोडीने अखेरीस जोरदार फटकेबाजी करत हैदराबादला २०० पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी २०२ धावांचं आव्हान उभं केले.

हैदराबादच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने एका धावेवर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनची विकेट गमावली. पण यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यातील १३३ धावांच्या भागीदारीने राजस्थानला विजयाच्या जवळ आणले होते, पण तरीही संघ विजयाची नोंद करू शकला नाही.

सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध शेवटच्या बॉलवर १ रनने थरारक विजय मिळवला आहे. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर २ धावांची गरज होती. तेव्हा हैदराबादचा बॉलर भुवनेश्वर कुमारने अचूक बॉल टाकत रोवमॅन पॉवेल याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. हैदराबादने अशाप्रकारे १ रनने रोमहर्षक विजय मिळवला. हैदराबादने यासह राजस्थानचा विजयरथ रोखला. हैदराबादने राजस्थानला विजयासाठी २०२ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानला २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून २०० धावाच करता आल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -