Nashik : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी सराईत व संघटित गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ४६ सराईत गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. आणखी काही गुन्हेगारांच्या हद्दपारीच्या प्रस्तावांची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. (habitual criminals externed)
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर नोएडा येथून तब्बल ४.७९८ किलो ...
सण-उत्सवांच्या काळात नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा, यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवणाऱ्या व्यक्तींविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा, एमपीडीए तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ-१ अंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला. (habitual criminals externed)
Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्यातील शेंदवड-मोहगावजवळील शिवाऱ्या ...
संबंधित पोलीस ठाण्यांकडून प्राप्त हद्दपारी प्रस्तावांची विभागीय सहायक पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५, ५६ (१) (अ) (ब) व ५७ अन्वये ४६ गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले. आणखी काही गुन्हेगारांविरुद्धचे प्रस्ताव चौकशीच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यांच्यावरही हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. आगामी सण-उत्सव निर्विघ्न पार पडावेत यासाठी स्थानबद्धता, एमपीडीए आणि संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यांतर्गतही कारवाई अधिक व्यापक करण्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (habitual criminals externed)
Nashik : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने नाशिक त्रंबकेश्वर रोडवर संयुक्तिक कारवाई करत बनावट नोटांचा कारखाना ...
कोणत्या भागातील किती गुन्हेगार ?
पंचवटी - १९
म्हसरूळ - ९
आडगाव - २
भद्रकाली - ६
मुंबई नाका - २
सरकारवाडा १
गंगापूर - ७






