Nashik : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने नाशिक त्रंबकेश्वर रोडवर संयुक्तिक कारवाई करत बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त केला आहे. दरम्यान या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्री सह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील सर्व ...
नेमकं प्रकरण काय ?
त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव गावात एका बंगल्यात सुरू नोटा छापण्याचा अड्डा सुरु होता. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई करत थेट बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त केला आहे. या चलनी नोटां एका विशिष्ट केमिकल मध्ये बुडवून त्या नोटांची शाई कागदावर वटवून तयार केल्या जात होत्या.
दहा लाख रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यात तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा देताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नोटा छापण्याचा रॅकेट प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांकडून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून अमरेश्वर आईथा तेलंगणा, दासरी सत्यइ तेलंगणा, गोकुळ दाते तळेगाव नाशिक 4.हिरामण दाते (तळेगाव नाशिक ) मच्छिंद्र घनदाट सातपूर या पाच आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली अटक केले आहे.
दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.






