Monday, August 10, 2026

MOTO TABLET : मोटोचा नवा टॅबलेट बाजारात; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

MOTO TABLET : मोटोचा नवा टॅबलेट बाजारात; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Moto Pad 70 Launch : लेनोवोच्या मालकीच्या मोटोरोला ब्रँडने भारतात आपला नवीन Moto Pad 70 टॅब्लेट लॉन्च केला आहे. मोठा 2.5K डिस्प्ले, 10,200mAh क्षमतेची बॅटरी, 68W फास्ट चार्जिंग आणि AI फीचर्समुळे हा टॅबलेट चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, टॅबलेटसोबत Moto Pen आणि Moto Folio Keyboard बंडलमध्ये मिळत आहेत.

किंमत किती?

Moto Pad 70 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये, तर 8GB RAM + 256GB मॉडेलची किंमत 36,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या टॅबलेटची विक्री 15 ऑगस्टपासून Flipkart आणि Motorola India वेबसाइटवर सुरू होणार आहे. हा टॅबलेट Pantone C Angel या रंगात उपलब्ध असेल.

2.5K डिस्प्ले आणि दमदार परफॉर्मन्स

Moto Pad 70 मध्ये 12.1 इंचाचा 2.5K IPS टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन 1,600x2,560 पिक्सेल असून 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्ले 96 टक्के DCI-P3 कलर कव्हरेज देतो. सामान्य वापरात 600 निट्स आणि HBM मोडमध्ये 800 निट्सपर्यंत ब्राइटनेस मिळतो. TÜV Rheinland प्रमाणपत्रामुळे फ्लिकर-फ्री आणि लो ब्लू-लाइट अनुभव मिळतो. परफॉर्मन्ससाठी ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर आणि Arm Mali-G57 MC2 GPU देण्यात आला आहे. 8GB LPDDR4X RAM सोबत 128GB आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज पर्याय मिळतात. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते.

13MP कॅमेरा अन् AI फीचर्स

फोटोग्राफीसाठी 13MP रिअर कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Dolby Atmos सपोर्ट असलेले क्वाड स्पीकर्स आणि ड्युअल मायक्रोफोन सिस्टीमही मिळते. Gemini इंटिग्रेशनसह Circle to Search, AI Summary आणि AI Continue Writing यांसारखी AI फीचर्स टॅबलेटमध्ये आहेत.

10,200mAh बॅटरी

Moto Pad 70 मध्ये 10,200mAh बॅटरी असून 68W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. बॉक्समध्ये 68W पॉवर अडॅप्टर मिळतो. Moto Pen मध्ये 4,096 स्तरांची प्रेशर सेन्सिटिव्हिटी, टिल्ट डिटेक्शन आणि पाम रिजेक्शन मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 5, Bluetooth 5.2, USB-C आणि Pogo-pin कनेक्टर देण्यात आले आहेत. टॅबलेटला IP52 रेटिंग असून तो Android 16 वर चालतो. मोटोरोला Android 18 पर्यंत OS अपग्रेड आणि 2030 पर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन देत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा