गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानीत आश्रमशाळेत रात्री गाढ झोपलेल्या सहा मुलींना सर्पदंश झाल्याची घटना घडली. सर्पदंशामुळे सहा पैकी तीन मुलींचा मृत्यू झाला. इतर तीन मुलींची प्रकृती गंभीर आहे. या तिघींना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलींवर उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तराखंड, ...
जपतलाई येथे कुप्पा लिंगो शैक्षणिक व संस्कृती विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाची घटना घडली. सर्पदंशामुळे सुश्मिता सरोजित मंडल (वय १४), दीपिका एतवा लकडा (वय १२), अनु गजुराम कोरेटी (वय ८) यांचा मृत्यू झाला. तर दीपिका बिटलूरसाय मडावी (वय ११), समृद्धी सुरेश नैताम (वय १४), कविता राजकुमार किरंगा (वय १२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- मंत्री नितेश राणे; त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची गरज मुंबई : ज्या संस्थांमध्ये किंवा मदरशांमध्ये 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' म्हटले जात ...
आश्रमशाळेत मुली जमिनीवर अंथरलेल्या गाद्यांवर झोपतात. यामुळेच साप आल्याचे त्यांना समजले नाही. जेव्हा सर्पदंशाची घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षक गैरहजर होत्या.
संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी सुरक्षित वातावरणात वावरत असताना मुलींसाठी एवढे असुरक्षित वातावरण कसे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सर्पदंश प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भारतीय बॉक्सर ...
आश्रमशाळेत सुरक्षित वातावरण नसल्यामुळेच तीन मुलींचा जीव गेला आहे. या प्रकरणी प्रकल्प अधिकाऱ्याला तातडीने निलंबित अशी मागणी होऊ लागली आहे.






