पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. मुळा-मुठा नदीच्या पात्रात तरंगताना झुडपांमध्ये अडकलेल्या अवस्थेत एका अवघ्या एक दिवसाच्या नवजात मुलीचा मृतदेह आढळून आला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. FYJC Admission 2026 ची पाचवी ...
नदीपात्रात काहीतरी तरंगताना दिसल्याने स्थानिक नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, झुडपांमध्ये हे लहानसे अर्भक अडकल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता या घटनेची माहिती तात्काळ वाघोली पोलीस ठाण्याला दिली. बातमी समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने त्या निष्पाप चिमुरडीचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासणीत हे अर्भक अवघ्या एका दिवसाचे स्त्री जातीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी तो पुण्यातील ससून रुग्णालयात रवाना केला आहे. जन्मानंतर लगेचच या चिमुरडीला नदीत कोणी आणि का फेकून दिले, यामागे स्त्री भ्रूणहत्या किंवा अनैतिक संबंध लपवण्याचा प्रयत्न आहे का, या सर्व बाजूंनी वाघोली पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. आरोपींचा सुगावा लावण्यासाठी परिसरातील प्रसूती गृहे, रुग्णालयांची माहिती गोळा केली जात असून भागातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजचीही कसून तपासणी सुरू आहे.






