Saturday, August 8, 2026

Jalgaon Accident News : काळ आला होता; पण..., ४ जण अपघातातून थोडक्यात बचावले

Jalgaon Accident News : काळ आला होता; पण..., ४ जण अपघातातून थोडक्यात बचावले

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातून अपघाताचा एक अंगावर काटा आणणारा थरारक प्रकार समोर आला आहे. चार प्रवाशांसाठी मध्यरात्रीचा काळ हा सुदैवाने काळरात्री ठरता ठरता राहिला. मध्यरात्री सुमारे ३ वाजेच्या सुमारास विदगाव येथील तापी नदीच्या पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीपात्रात कोसळली. जळगावहून चोपड्याकडे जाणारे हे प्रवासी अपघातातून थोडक्यात बचावले. स्थानिक नागरिकांच्या रूपाने जणू देवच या प्रवाशांच्या मदतीसाठी आला. (Jalgaon Accident News)

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोपडा येथील काही रहिवासी कारने जळगावहून घराकडे परतत होते. रात्री सुमारे ३ वाजता विदगाव पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट तापी नदीच्या पात्रात कोसळली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यांनी कारमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Jalgaon Accident News)

दरम्यान, सकाळी सुमारे १० वाजता क्रेनच्या साहाय्याने नदीपात्रातून कार बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी जळगाव-चोपडा मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान, याठिकाणी झालेला हा पहिला अपघात नाही. पुलाजवळील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होऊनही संरक्षण भिंत, लोखंडी कठडे किंवा अन्य प्रभावी सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. (Jalgaon Accident News)

काही महिन्यांपूर्वी दोघांचा गेला होता बळी

विशेष म्हणजे, याच विदगाव येथील तापी नदीपात्रात काही महिन्यांपूर्वी असाच भीषण कार अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत एका महिलेसह एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >