Saturday, August 8, 2026

Nashik News : बॅनर लावताना विजेचा धक्का बसला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ! तरुणाचा मृत्यू

Nashik News : बॅनर लावताना विजेचा धक्का बसला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ! तरुणाचा मृत्यू

Nashik News : नाशिक शहरात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह शिगेला असताना आणि मित्रांसोबत कार्यक्रमाची तयारी करताना एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. दुगाव फाटा येथे आदिवासी दिनानिमित्त बॅनर लावत असताना विजेचा भीषण धक्का (Electric Shock) लागून २२ वर्षीय रोहित विष्णू गायकवाड (Rohit Gaikwad) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घडलेल्या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त आहे. (Nashik News)

नेमकं काय घडलं ?

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रोहित गायकवाड (Rohit Gaikwad) हा मित्रांसोबत दुगाव फाटा परिसरातील (Dugaon Phata Area) पानटपरी स्टॉपजवळ आदिवासी दिनाचे बॅनर लावण्याचे काम करत होता. बॅनरचे समायोजन करताना किंवा जुना फलक बाजूला करताना अचानक वरून गेलेल्या उच्चदाबाच्या किंवा उघड्या वीजवाहिनीचा (लाइव्ह वायर) झटका रोहितच्या हाताला बसला. तर त्याच्या सोबत असलेल्या दोन मित्रांनाही विजेचा धक्का बसला मात्र विजेच्या धक्क्याने ते दूर फेकले गेले. दैव बलवत्तर त्यामुळे सुदैवाने ते दोघे बचावले. (Nashik News)

बॅनरने हिरावला ‘रोहित’चा श्वास

मात्र रोहित (Rohit Gaikwad) या घटनेत दुर्दैवी जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रोहितच्या वडिलांनी आणि ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला गिरणारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) हलवण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Medical Officers) तपासणी करून रोहितला मृत घोषित केले. या घटनेनं रोहितच्या कुटुंबात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची नोंद नाशिक तालुका पोलीस ठाण्यात (Nashik Taluka Police Station) करण्यात आली आहे. (Nashik News)

उघड्या वायर्स म्हणजे मृत्यूला आमंत्रण

सण-उत्सव किंवा जयंतीनिमित्त तरुणाई मध्ये उत्साह असतो. अशावेळेस हा तरुण वर्ग उत्साहाने रस्त्यांवर आणि उंचावर जाऊन फ्लेक्स/ बॅनर लावतात. मात्र, अशा वेळी आसपास विजेच्या तारा आहेत का, याची साधी दक्षताही घेतली जात नाही. त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी किंवा टपऱ्यांवर उघड्या लटकणाऱ्या वीजवाहिन्यांकडे महावितरणचे (Mahavitaran) देखील होणारे दुर्लक्ष निष्पाप जीवांच्या जीवावर उठत असल्याचा रोष ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >