Nashik : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील प्रसिद्ध भावली धरण (Bhavli Dam) परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या अमानुष हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. महिलेची छेड काढल्यानंतर तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप या आरोपींवर आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील एका आरोपीचा धावत्या कारच्या दरवाजाला लटकून हल्ला करण्याचा आणि काही क्षणांतच महामार्गावर कोसळल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून या घटनेचा संताप व्यक्त करण्यात आला. (Nashik Crime News)
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पारनेर नगरपंचायतीचे भाजप नगरसेवक ...
न्यायालयात काय घडलं ?
आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी सरकारी पक्ष आणि बचाव पक्षामध्ये जोरदार युक्तिवाद रंगला. सरकारी पक्षाने न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताना तपासासाठी अनेक महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असल्याचे सांगितले. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, सुरुवातीला आरोपींना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, त्यावेळी अधिकृत अटक करण्यात आलेली नव्हती. घटना घडलेला परिसर अतिदुर्गम असून तेथे मोबाईल नेटवर्क नसल्याने पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे शक्य झाले नव्हते. (Nashik Crime News)
सरकारी वकिलांनी पुढे सांगितले की, पीडित कुटुंबातील तरुणीची छेड काढून टवाळखोरांनी शिट्ट्या मारल्या. त्याला विरोध केला असता संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यात आली. पीडित कुटुंब गाडीतून पळून जात असताना आरोपींनी रस्त्यात तब्बल 6 ठिकाणी गाडी अडवून तोडफोड केली आणि प्रचंड दहशत माजवली. पर्यटकांची चोरीला गेलेली सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यारे जप्त करणे बाकी आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवणे गरजेचे आहे. तसेच पर्यटकांना शिट्ट्या मारणारे मुख्य टवाळखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. (Nashik Crime News)
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असतानाच, आता शहरातील कात्रज परिसरातून आणखी एक धक्कादायक ...
आरोपींच्या वकिलांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर आक्षेप घेतले. फिर्यादीने तक्रारीत सुमारे ३० किलोमीटर पाठलाग करून मारहाण झाल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, दुसरीकडे टोल नाक्यापर्यंतच घटना घडल्याचे सांगितले जात असल्याने फिर्यादीच्या कथनात विसंगती असल्याचा दावा बचाव पक्षाने केला. याशिवाय, घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही फिर्यादी कुटुंबाने मारहाण केल्याचा आरोप बचाव पक्षाने केला. पोलिसांना मूळ आरोपींची खात्री नसताना संशयावरून अनेकांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच आरोपींवर लावण्यात आलेले जीवघेण्या हल्ल्याचे कलमही चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. (Nashik Crime News)
वेल्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून विजय मिळवला ...
१८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
दोन आरोपींना रात्री अडीच वाजता अटक करण्यात आली होती. त्यांना २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे आवश्यक होते. त्यामुळे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही बचाव पक्षाने न्यायालयाकडे केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य, तपासातील प्रलंबित बाबी आणि फरार आरोपींचा शोध लक्षात घेऊन सर्व आरोपींना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या घटेनमुळे शहरात खळबळ उडाली आहे.






