शेवगाव : नगरपरिषदेमार्फत सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, दशक उलटूनही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पात आर्थिक अनियमितता आणि संभाव्य भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. (Shevgaon)
मुंबई: भारतात प्रथमच क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म (Quick commerce platform) इन्स्टामार्टने एलपीजी (LPG) सिलेंडरची ऑन-डिमांड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. यासाठी कंपनीने ...
या प्रकल्पासाठी एका शेतकरी महिलेने काही अटींवर शहरालगतची स्वतःची जमीन नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने संबंधितांमध्ये नाराजी आहे. या प्रश्नाकडे यापूर्वीही वृत्तपत्रांतून लक्ष वेधण्यात आले होते. (Farmers News)
याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा दिशा समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा दर्जा, झालेला खर्च आणि प्रकल्पाची उपयुक्तता यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ( Ahilyanagar News)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत आणि ब्रिटन यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए) आणि सामाजिक सुरक्षा ...
चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, दोषींना निलंबित करावे, संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच शासनाची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. ( Sewage Treatment Plant)
जिल्ह्यात अलीकडे विविध विकासकामांतील गैरव्यवहारांवर कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातही निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






