Sunday, October 11, 2026

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या फिरतानाचे थरारक दृश्य कैद झाले असून, ही घटना समोर आल्यानंतर वनविभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

माथेरान हे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून, येथे मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यामुळे अनेकदा जंगल परिसरात बिबट्या, माकडे आणि इतर वन्यप्राण्यांची वर्दळ आढळून येते. हनिमून पॉईंट परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आला.(Lepoard)

बिबट्याच्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये भीतीपेक्षा कुतूहल आणि उत्सुकता अधिक दिसून येत आहे. मात्र, वन्यप्राण्यांच्या अधिवासात जाताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, एकट्याने निर्जन भागात फिरणे टाळावे आणि बिबट्या किंवा कोणताही वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून परिसरात बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.माथेरानच्या जंगल परिसरात बिबट्याचा वावर यापूर्वीही अनेकदा आढळून आला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून हा भाग वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पर्यटन वाढत असताना मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. (Matheran)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >