मुंबई: भारतात प्रथमच क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म (Quick commerce platform) इन्स्टामार्टने एलपीजी (LPG) सिलेंडरची ऑन-डिमांड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. यासाठी कंपनीने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) सोबत भागीदारी केली असून, ग्राहक आता थेट ॲपद्वारे एलपीजी सिलेंडर ऑर्डर करू शकणार आहेत.
सध्या ही सेवा बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे ग्राहकांना एचपी नव्या 10 किलो कंपोझिट एलपीजी सिलेंडर आणि 5 किलो मेटल सिलेंडर उपलब्ध होणार आहेत. भविष्यात ही सुविधा इतर शहरांमध्येही सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. ( LPG Cylinder Delivery)
प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वाट मिटवायला बोलावून केला घात, २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या अमरावती : अमरावती (Amravati) शहरात एक अत्यंत थरारक घटना उघडकीस ...
एचपी नव्या सिलेंडरची वैशिष्ट्ये
- पारंपरिक सिलेंडरपेक्षा वजनाने हलका
- गंज-प्रतिरोधक (Rust Resistant)
ही सेवा विशेषतः लहान कुटुंबे, विद्यार्थी, नोकरदार आणि अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, नवीन सिलेंडर खरेदी करण्यासाठी आधीपासून एलपीजी कनेक्शन असणे आवश्यक नाही. ( Instamart)
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असतानाच, आता शहरातील कात्रज परिसरातून आणखी एक धक्कादायक ...
रिफिलची सुविधाही उपलब्ध
पहिली ऑर्डर नवीन कनेक्शन म्हणून गणली जाईल. त्यानंतर ग्राहक रिकामा एचपीसीएल सिलेंडर परत करून रिफिल मागवू शकतील. सिलेंडरची डिलिव्हरी अधिकृत एचपीसीएल वितरक आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.
कंपनीच्या मते, या उपक्रमामुळे एलपीजी सिलेंडर खरेदी आणि रिफिलची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि ग्राहकांसाठी अधिक सोयीस्कर होणार आहे. (India News)






