फिलाडेल्फिया : FIFA World Cup 2026 मधील फ्रान्स (France) आणि इराक (Iraq) यांच्यातील ग्रुप-I सामना वादळी हवामानाचा इशारा (Severe Weather Alert) मिळाल्यानंतर मध्यंतरात (Half-Time) स्थगित करण्यात ...
मुंबई शहराला इशारा
दरम्यान, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांसाठी प्रशासनाकडून पुढील 3 तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. अधिकृत माहितीनुसार, या कालावधीत काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.आज सकाळी झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली असून उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. काळे ढग, थंड वारे आणि रिमझिम पावसामुळे वातावरण आनंददायी झाले आहे. सोशल मीडियावरही मुंबईतील पावसाच्या चर्चा रंगल्या असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. (Maharashtra Rain Alert)
मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात 'वेदर स्टेशन' (Weather Station) बसवण्याचा ...
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. पुढील 48 तासांत मान्सून मुंबईत अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो.प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, झाडाखाली उभे राहू नये आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी हा पाऊस दिलासादायक असला तरी पुढील काही तास सतर्क राहणे आवश्यक आहे.






