नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याची इच्छा असणे ही सकारात्मक बाब आहे. यातून भारतीय लोकशाहीची ताकद अधोरेखित होते. आपल्या राजकीय प्रवासाकडे पाहताना मुख्यमंत्री होऊ, असा विचार सुरुवातीला कधीच केला नव्हता. राजकारणात प्रवेश केला त्यावेळी सत्ता मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. विरोधी पक्षात राहून आंदोलन आणि संघर्ष करण्यासाठीच राजकारणात आलो होतो. मात्र आपला प्रवास नगरसेवकापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. त्यामुळे भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यक्त केला. मनात ठाम ध्येय असेल आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, तर कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते, असे फडणवीस म्हणाले.
मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) रात्री मोठी दुर्घटना घडली. २२ फूट ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात मंथन फॉर युवा या कार्यक्रमातून जेन झी तरुणांशी संवाद साधला. यात त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल भाष्य केले. यासह यशानंतर येणाऱ्या दबावावरही भाष्य केले. मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यासोबत मानसिक दबावही निर्माण होतो. मात्र, हा दबाव कसा हाताळायचा, याबाबत फडणवीसांनी त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले. नागपुरात कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. या कार्यक्रमात ४१०० मुलांमुलींनी ढोल ताशा वादनाचा विक्रम केला. जेन झी यांना दिशा दाखवणारा हा कार्यक्रम होता. गेले काही दिवस मंथन फॉर युवाच्या माध्यमातून दीड लाख तरुणांनी भाग घेतला. आजही रेशीमबाग मैदानावर २० ते २५ हजार तरुण तरुणी उपस्थित होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रात मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम होता, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुणे : पुण्यात राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शनिवारी काँग्रेसवर ...
दबावाबाबत बोलताना त्यांनी राजकारणाला व्यवसाय मानत नसल्याचे स्पष्ट केले. सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याचे राजकारण हे प्रभावी माध्यम असल्यामुळे आपण या क्षेत्रात आलो, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी जीवनातील संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला. तरुण वयात आंदोलनांमध्ये सहभागी होताना अटक, पोलिसांचा सामना आणि तुरुंगवासाचा अनुभव आल्याचेही त्यांनी सांगितले. या संघर्षामुळे कठीण परिस्थितीचा सामना करण्याची मानसिक तयारी निर्माण झाली, असे त्यांनी नमूद केले. यश मिळाल्यानंतर येणारा दबाव वेगळा असला तरी संघर्षाच्या काळातच त्याला सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते, असा संदेश फडणवीसांनी यावेळी तरुणांना दिला. ध्येय मोठे ठेवण्यासोबतच त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी देशभरात एक महिनाभर चालणाऱ्या ‘सेवा संकल्प ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाला महिला, विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी या कार्यक्रमातून महिला व विद्यार्थिनींच्या अधिकारावर भाष्य केले. मात्र याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असल्याचा आरोप केला. पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधी महिला अधिकारावर बोलले, परंतु याच राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला विरोध केला. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. काँग्रेस दिशाहीन पक्ष असून केवळ बोल बच्चन करणारे नेते आहे. या पक्षाची जमिनीपासून नाळ तुटली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात आलेले आदिवासी विद्यार्थी नेते कुठल्या पक्षाचे होते, तेही बघावे, असे मत व्यक्त केले. आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार जेवढ्या योजनाचा लाभ देते, तेवढे कोणतेही राज्य देत नाही. वसतिगृहात जागा न मिळालेल्या २० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६० हजार रुपये देण्यात येत आहे. तरुणाईला दिशा देण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.






