मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक सेनेच्यावतीने अंधेरीतून आयोजीत केलेल्या कावड यात्रेच्या शुभारंभ सोहळ्यात बोलत होते. यावेळी मंचावर आमदार मुरजी काका पटेल, आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते. मंत्री नितेश राणेंची गर्जना ऐकताच उपस्थितांनी ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘शंभो शंभो’ असा जयघोष केला. संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारला होता.
नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याची इच्छा असणे ही सकारात्मक बाब आहे. यातून भारतीय लोकशाहीची ताकद अधोरेखि ...
View this post on Instagram
'हिंदू सण इथे थाटामाटात साजरे करायचे नाहीत तर काय पाकिस्तानमध्ये साजरे करायचे असा सवाल नितेश राणेंनी केला. आपला हा देश एक हिंदू राष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई ही महादेवाची भूमी आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू सण अशाच थाटामाटात साजरा झाला पाहिजे, हे आम्हा सर्वांचे मत आहे. म्हणूनच, मी येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना सांगू इच्छितो की, आपण प्रत्येक आगामी हिंदू सण थाटामाटात साजरे केले पाहिजे. महाराष्ट्र सरकार आणि आपले मुख्यमंत्री हिंदुत्ववादी विचारांचे असल्यामुळे, आपण सर्वांनी आपले सर्व सण याच उत्साहाने साजरे केले पाहिजेत'; असेही मंत्री नितेश राणे म्हणाले. नितेश राणेंचे वक्तव्य ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल ...
View this post on Instagram
कोणाचीही पर्वा न करता प्रत्येक सण उत्साहाने साजरा करा. तुम्ही असे कार्यक्रम कुठेही आयोजित करण्याची योजना आखा. कावड यात्रा असो किंवा इतर कोणतीही तीर्थयात्रा, तुम्ही कोणताही मार्ग निवडा... जवळपासची मशीद कितीही मोठी असली तरी तुम्ही काळजी करू नका... असे मंत्री नितेश राणे म्हणाले. तुमचे सर्व भगवे कपडे घातलेले बंधू आज मंत्रिमंडळात आणि सत्तेत आहेत असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा ...
View this post on Instagram
तुमचे आमदार हे सर्वप्रथम आमदार आणि कट्टर हिंदुत्ववादी आहेत. मी त्यांना चांगले ओळखतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. मी तुम्हा सर्वांना खात्री देऊ इच्छितो की, मुंबईत तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. महाराष्ट्रातील हे सरकार राज्यातील हिंदूंनी निवडून दिले आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला निवडून दिले आणि मंत्रिपदांवर बसवले, हे तुम्ही लक्षात ठेवावे. त्यामुळे, मी तुम्हाला आत्ताच खात्री देऊ इच्छितो की, हे सरकार तुमचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला सक्षम करण्यासाठी आणि प्रत्येक हिंदू सण त्याच ताकदीने साजरा करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे आहे; असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ...
View this post on Instagram
मुंबईत एक हिंदू म्हणून जगा. सध्या तरी मुरजी भाईंनी आपल्याला त्रिशूळ दिला आहे. आता तो त्रिशूळ धारण करणे हे आपले काम आहे. महादेवजींचे काम फक्त आपल्याला आशीर्वाद देणे आहे; बाकीचे काम आपले आहे, बरोबर ना ? असे सूचक वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले. जर कोणी तुमच्याकडे वाईट नजरेने पाहिले, तर महादेवाने आम्हाला हा त्रिशूळ कसा वापरायचा हे उत्तम प्रकारे शिकवले आहे. कशाचीही चिंता करू नका. आम्ही असा त्रिशूळ वापरू की शुक्रवारी त्यांचे सिलिंडरसुद्धा उभे राहू शकणार नाहीत. आमच्या सर्वांमध्ये तेवढी शक्ती आहे. अजिबात काळजी करू नका; असे नितेश राणे म्हणाले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे ...
View this post on Instagram



