Saturday, June 6, 2026

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी तिची नवी ओळख निर्माण झाली आहे. गौतमी पाटील (Gautami Patil)  आता अनेक नवीन गाण्यांमधून प्रेक्षकांना भेटायला येत असते. दादा कोंडके यांच्या लोकप्रिय आणि सदाबहार गाण्यांपैकी एक असलेल्या ‘हिल हिल पोरी हिला’ या गाण्याचा नवा अवतार घेऊन गौतमी पाटील आणि भाऊ कदम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विशेष म्हणजे एका दिवसांत गाण्याला लाखो विव्ह्यूज मिळालेले असून या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हिल हिल पोरी हिला

या गाण्याचे चित्रीकरण कोकणातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले असून, हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे आणि मनमोहक लोकेशन्समुळे म्युझिक व्हिडीओला वेगळे आकर्षण लाभले आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांच्या दमदार आणि सुरेल आवाजामुळे या गाण्याला नवी ऊर्जा मिळाली आहे.

म्युझिक व्हिडीओमध्ये गौतमी पाटील (Gautami Patil) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) यांनी विविध आकर्षक लूक साकारले आहेत. सुरुवातीच्या सीनमध्ये गौतमी पाटील लाल रंगाच्या पारंपरिक नऊवारी साडीत दिसत आहे तर पुढील काही सीनमध्ये दोघेही काळ्या वेशभूषेत, रेट्रो स्टाईल आणि वेस्टर्न लूकमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या लूकसोबतच दोघांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त नृत्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदसम्राट दादा कोंडके (Dada Kondke) हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट आणि त्याती गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘अंजनीच्या सुता’, ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम’ यांसारख्या अनेक गाण्यांनी महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना भुरळ घातली आहे. अशाच दादा कोंडके यांच्या लोकप्रिय आणि सदाबहार गाण्यांपैकी एक असलेल्या ‘हिल हिल पोरी हिला’ या गाण्याचा नवा अवतार पुन्हा पहायला मिळाला आहे.

आंधळा मारतो डोळा चित्रपटातील अजरामर गाणं

‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील असून त्या काळात घे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तब्बल 52 वर्षांनंतर या गाण्याला आधुनिक संगीत आणि नव्या सादरीकरणाची जोड देत त्याचे रिमेक व्हर्जन सादर करण्यात आले आहे. या नव्या गाण्यात गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांकडून दोघांच्याही केमिस्त्रींचे मोठे कौतुक होत आहे.

या गाण्याचे चित्रीकरण कोकणातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले असून, हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे आणि मनमोहक लोकेशन्समुळे म्युझिक व्हिडीओला वेगळे आकर्षण लाभले आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांच्या दमदार आणि सुरेल आवाजामुळे या गाण्याला नवी ऊर्जा मिळाली आहे.

गाण्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

गाण्याच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भाऊ कदम यांची कन्या मृण्मयी कदम हिने देखील या गाण्याचे कौतुक करत, गाणं खूप आवडलंय… Loved It! खूप मस्त. मी कधी एकदा या गाण्यावर डान्स करतेय असं झालंय अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याशिवाय अनेक नेटकऱ्यांनीही या नव्या जोडीचे आणि गाण्याच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले आहे. गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला, दोघांनीही जबरदस्त डान्स केला आहे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment