मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) ज्वेलरी शोरूमशी संबंधित कथित फसवणूक प्रकरण. चंदीगड येथील जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात सलमान खान, त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्री तसेच ‘स्टाईल अँड कंटेंट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड’च्या संचालकांना समन्स बजावले आहेत.
फुटबॉल जगतातील लोकप्रिय तारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर, मॉडेल जॉर्जियाना रॉड्रिगेझ यांच्या लग्नाची चर्चा सध्या जगभरात जोरदार सुरू ...
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीशी संबंधित आहे. तक्रारदार अरुण गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस’च्या सेटवर सलमान खानशी (Salman Khan) भेट झाली होती. त्यावेळी सलमानने त्यांना ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरीचे शोरूम सुरू करण्याचा सल्ला दिला आणि उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले होते.
सलमानवर (Salman Khan) विश्वास ठेवून अरुण गुप्ता यांनी ‘बीइंग ह्युमन ज्वेलरी’ची फ्रँचायझी घेतली आणि शोरूम उभारण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यातील जवळपास 1 कोटी रुपये शोरूमच्या उभारणीवर खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी ‘स्टाईल अँड कंटेंट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत करार केला होता. ही कंपनी ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरी ब्रँडच्या मार्केटिंग आणि परवान्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.
शोरूम बंद झाल्याचा आरोप :
अरुण गुप्ता यांनी आरोप केला आहे की, त्यांनी करारातील सर्व अटी पूर्ण केल्या होत्या. मात्र शोरूम सुरू झाल्यानंतर कंपनीकडून अपेक्षित व्यावसायिक सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर अचानक शोरूम बंद करण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२० पासून शोरूम बंद असल्याने मालाच्या साठ्याशी संबंधित अडचणी निर्माण झाल्या आणि व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, मणिमाजरा येथे ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरी शोरूम सुरू करण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यात आले. कंपनीशी संबंधित काही व्यक्तींनी व्यवसायाच्या संधीबाबत चुकीची माहिती देऊन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Salman Khan)
मुंबई : चर्चेत राहिलेल्या ३७० रुपयांच्या बिर्याणी वादानंतर काही महिन्यांनी प्रसिद्ध कॉमेडीयन प्रणित मोरे (Pranit More) पुन्हा एकदा 'स्टँड-अप कॉमेडी'च्या (Stand Up ...
कंपनीने आरोप फेटाळले :
दरम्यान, संबंधित कंपनीने यापूर्वीच हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये झालेल्या करारामध्ये सलमान खानची कोणतीही थेट भूमिका नव्हती. कंपनीने स्पष्ट केले की, ‘सलमान खान फाउंडेशन’ने २०१५ मध्ये ‘स्टाईल अँड कंटेंट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड’ला ‘बीइंग ह्युमन’ ब्रँडचे लायसन्स दिले होते. मात्र, ज्वेलरी व्यवसायाचे संचालन, मार्केटिंग आणि विक्रीची जबाबदारी संबंधित कंपनीची होती. (Salman Khan)
पोलिसांनंतर आता कोर्टात प्रकरण :
अरुण गुप्ता यांनी २०२१ मध्ये या प्रकरणी चंदीगड पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सलमान खान, अलविरा खान अग्निहोत्री आणि ‘बीइंग ह्युमन’शी संबंधित काही व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, प्रकरणाचा तोडगा न निघाल्याने तक्रारदाराने जिल्हा न्यायालयात धाव घेतली. आता न्यायालयाने समन्स बजावल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दरम्यान, या प्रकरणावर सलमान खान (Salman Khan) किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.





