बलाढ्य गुजरातसमोर राजस्थानचे 'वैभव'शाली आव्हान
सुशील परब
मुंबई : आयपीएल २०२६ चा थरार आता अंतिम आणि सर्वात रंजक टप्प्यात पोहोचला असून अंतिम फेरीत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध कोण भिडणार, याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ‘क्वालिफायर-२’चा महासंग्राम होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट ३१ मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील लोणी परिसरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोणीजवळील चंद्रपूर गावातील साठवण तलावात (Lake) बुडून तीन तरुण ...
पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पराभव पत्करल्यानंतर गुजरात टायटन्ससमोर ही अखेरची संधी आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातचा संघ पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवत जबरदस्त आत्मविश्वास मिळवला आहे.
या सामन्यातील सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे राजस्थानचा अवघा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. एलिमिनेटरमध्ये त्याने केवळ २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची विस्फोटक खेळी करत संपूर्ण क्रिकेटविश्वाला थक्क केले. चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्याने राजस्थानला एकहाती विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते.
प्रश्नपत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी वायुदलावर नवी दिल्ली : देशभरात सातत्याने गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील घोटाळे ...
मात्र वैभवसमोर आता गुजरातच्या अनुभवी आणि आक्रमक वेगवान गोलंदाजीचे मोठे आव्हान असणार आहे.
मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा आणि प्रसिद्ध कृष्णा ही वेगवान तिकडी सुरुवातीपासूनच त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे उसळी घेणाऱ्या आणि वेगवान चेंडूंविरुद्ध वैभव काहीसा अडखळताना दिसला आहे. त्यामुळे गुजरात त्याच कमजोरीवर अचूक प्रहार करण्याच्या तयारीत असेल.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ल्यांवर आता रात्री १० वाजताच शटर डाउन (Shut Down) होणार आहे. शहरातील वाढती गर्दी, वाहतूक कोंडी (Traffic) आणि कायदा-सुव्यवस्थेचा ...
दुसरीकडे सामन्यातील आणखी एक महत्त्वाचा संघर्ष म्हणजे गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यातील लढत. गिल हा गुजरातच्या फलंदाजीचा मुख्य आधार मानला जातो, तर आर्चर नव्या चेंडूवर धोकादायक मारा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. एलिमिनेटरमध्ये त्याने सुरुवातीच्या षटकांत अचूक आणि भेदक गोलंदाजी करत हैदराबादची फलंदाजी विस्कळीत केली होती.






