नाशिक : “मी अंध आहे, ही माझी चूक आहे का? मला शिकण्याचा अधिकार नाही का?” असा हृदय पिळवटून टाकणारा सवाल एका गरीब अंध विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात उपस्थित करत सर्वांच्या मनाला चटका लावला. सिडकोतील मोरवाडी परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला केवळ तो अंध असल्यामुळे प्रवेश देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नाशिक : नाशिकच्या कश्यपी धरण (Kashyapi Dam) येथे गेलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब ...
नेमकं प्रकरण काय ?
मोरवाडी भागात राहणारा एक अंध विद्यार्थी आपल्या आईसोबत शाळेत प्रवेशासाठी गेला होता. मात्र विविध कारणे सांगत शाळा प्रशासनाकडून त्याला प्रवेश देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. आपल्या मुलाला शिक्षण मिळावे यासाठी आईची सुरू असलेली धडपड, विद्यार्थ्याच्या डोळ्यातील अश्रू आणि त्याने व्यक्त केलेली वेदना उपस्थितांना अस्वस्थ करून गेली.
दरम्यान, हा प्रकार समजताच शिंदे सेनेच्या नगरसेविका किरण दराडे यांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांनी तातडीने शाळेत धाव घेतली. “अंध असणे हा गुन्हा नाही. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा समान अधिकार आहे,” अशी भूमिका घेत त्यांनी विद्यार्थ्याची आई आणि विद्यार्थ्यासोबत शाळेच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनानंतर शाळा प्रशासनाची एकच धावपळ उडाल्याचं पहायला मिळालं. अखेर शिक्षकांनी विद्यार्थ्याचा प्रवेश अर्ज भरून घेतला असून संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाईल, असे शालेय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. पण घडलेल्या या प्रकारामुळे शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






