Monday, July 13, 2026

'Lock Up 2' Riteish Deshmukh : रितेश देशमुखचा संयम सुटला! 'लॉक अप 2'च्या सेटवर स्पर्धकावर भडकला, VIDEO चर्चेत

'Lock Up 2' Riteish Deshmukh :  रितेश देशमुखचा संयम सुटला! 'लॉक अप 2'च्या सेटवर स्पर्धकावर भडकला, VIDEO चर्चेत

मुंबई : एकता कपूरचा (Ekta Kapoor) लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो (Reality Show) 'लॉक अप 2' (Lock Upp 2) दिवसेंदिवस अधिक चर्चेत येत आहे. या सीझनमध्ये राम कपूर (Ram Kapoor), आकांक्षा चमोला (Akansha Chamola) शिल्पा शिंदे (Shilpa Shinde), शिवांगी जोशी, हर्षद चोपडा यांसारखे लोकप्रिय कलाकार स्पर्धक (Contestants) म्हणून सहभागी झाले आहेत. तर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि दिग्दर्शिका (Director) फराह खान (Farah Khan) सूत्रसंचालनाची (Hosting) धुरा सांभाळत आहेत.

नेहमी शांत आणि मिश्कील स्वभावासाठी ओळखला जाणारा रितेश देशमुख यावेळी मात्र चांगलाच संतापलेला दिसला. 'लॉक अप 2'च्या नव्या प्रोमोमधील (Promo) त्याचा हा अवतार पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

रितेश देशमुख इतका का चिडला?

समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोन गटांमध्ये कंट्रोलर (Controller) बनण्यासाठी जोरदार शाब्दिक चकमक (Verbal Argument) सुरू असल्याचं दिसतं. टास्कनुसार (Task) कंट्रोलरला डिपेंडंटच्या (Dependent) वजनाइतके बॉक्स उचलायचे असतात. याचदरम्यान स्पर्धक योगेश रावत (Yogesh Rawat) रितेश देशमुखशी वाद घालताना दिसतो. योगेश बोलण्याचा प्रयत्न करत असताना तो म्हणतो, "सर, जर हेच करायचं होतं तर..." मात्र त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच रितेशचा संयम सुटतो. रितेश संतापून म्हणतो, "तू मला शिकवू नकोस... माझ्यासोबत हे नाटक चालणार नाही." त्याचा हा संताप सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत असून, या भागाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

डबल एव्हिक्शनमध्ये (Double Eviction) दोन स्पर्धक बाहेर

दरम्यान, 'लॉक अप 2'मध्ये नुकताच डबल एव्हिक्शन झाला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) रियाझ अली (Riyaz Aly) आणि अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांचा शोमधील प्रवास संपला. सुनीता आहुजा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शो सोडण्याचा निर्णय घेतला, तर रियाझ अलीला त्याच्या खेळामुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं.

'लॉक अप 2'मधील स्पर्धक (Contestants)

या सीझनमध्ये राम कपूर, शिल्पा शिंदे, शिवांगी जोशी, हर्षद चोपडा, आकांक्षा चमोला, आकांक्षा चौधरी, योगेश रावत, श्रेया कालरा आणि सुफी मोतीवाला यांच्यासह अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले आहेत. रितेश देशमुख आणि फराह खान यांच्या सूत्रसंचालनामुळे शोला वेगळी रंगत आली असून, 'लॉक अप 2' (Lock Upp 2) नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >