Friday, July 10, 2026

मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या

मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई : 'उर्स' उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) - नागपूर आणि नागपूर - नाशिक रोड दरम्यान ४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर अनारक्षित विशेष गाडी (२ सेवा)

गाडी क्रमांक 01021 (अनारक्षित विशेष) दिनांक ११.०७.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून ००:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५:४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01022 (अनारक्षित विशेष) दिनांक १२.०७.२०२६ रोजी नागपूर येथून २१:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३:५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

२) नागपूर - नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडी (२ सेवा)

गाडी क्रमांक 01203 (अनारक्षित विशेष) दिनांक १२.०७.२०२६ रोजी नागपूर येथून १८:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५:३० वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01204 (अनारक्षित विशेष) दिनांक १३.०७.२०२६ रोजी नाशिक रोड येथून ०७:५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०:०० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

थांबे: अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाड.

दोन्ही गाड्यांची संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी, आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी -सह-गार्ड ब्रेक व्हॅन्स

अनारक्षित विशेष डब्यांची तिकिटे युटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतील; यासाठी सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेले सामान्य दर आकारले जातील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा