रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १९ मार्च २०२६ रोजी 'धुरंधर : द रिवेंज' हा धुरंदर सिनेमाचा पुढील पार्ट रिलीज होणार आहे. धुरंदर सिनेमाचा पहिला भाग पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे.
हा चित्रपट आज म्हणजेच शुक्रवार १३ मार्च रोजी जगभरात रि-रीलीज करण्यात येणार आहे. नुकताच रणवीरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली असून हा सिनेमा तब्बल १००० सिनेमागृहात पुन्हा एकदा रिलीज करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध असतानाही चाहत्यांना पुन्हा एकदा हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. आता प्रेक्षक धुरंधर आणि 'धुरंधर : द रिवेंज' हे दोन्ही चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी अंत्यत उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
धुरंधरचा दुसरा भाग हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच गुढीपाडव्याला १९ मार्च रोजी हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. धुरंधरच्या पहिल्या भागाने जागतिक स्तरावर १,३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तर भारतात ८०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हिंदी चित्रपट ठरला.
अशातच आता 'जहाँ दर्द है वहा मर्द है ...' असं म्हणत धुरंदर २ चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.






