मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. (Rohit Shetty)
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकीसोबतच २० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून, पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आल्याचे समजते. (Rohit Shetty)
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. धमकीचा फोन नेमका कुठून आला, तो कोणत्या नेटवर्कद्वारे करण्यात आला आणि त्यामागील व्यक्ती किंवा टोळी कोणती, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपासासह कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुरावेही तपासले जात आहेत. (Rohit Shetty)
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गंगावेश ते रंकाळा स्टँड मार्गावरील पाडळकर मार्केटसमोरील Video Game Parlour वर जुना राजवाडा पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या ...
या धमकीमागे बिश्नोई गँगचा हात आहे का, याचाही पोलिसांकडून गंभीरपणे तपास सुरू आहे. अलीकडच्या काळात अनेक बॉलिवूड कलाकार, व्यावसायिक आणि नामवंत व्यक्तींना अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्यामुळे तपास यंत्रणा कोणतीही शक्यता नाकारत नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीही रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानावर गोळीबाराची घटना घडली होती. त्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आतापर्यंत १५ आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या नव्या धमकीचा त्या घटनेशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. (Rohit Shetty)
भिवंडी : भिवंडी शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावरील निम्बोळी परिसरात रविवारी (२८ जून) टायर आणि लाकडी पॅलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याने परिसरात एकच ...
दरम्यान, या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याबाबतही पोलिसांकडून विचार सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणातील अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असली, तरी धमकी देणाऱ्याचा लवकरच माग काढला जाईल, असा विश्वास तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. (Rohit Shetty)






