Sunday, June 28, 2026

Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!

Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!
पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा अनुभवता येते. महाराष्ट्रात अनेक सुंदर रस्ते आहेत, जे पावसाळ्यात आणखीनच मनमोहक बनतात. आपल्या मित्रांसोबत मान्सून ट्रिप करायची? तर या निसर्गरम्य ठिकाणी नक्की भेट द्या. 
कास पठार पावसाळ्यात हिरव्या गालिच्याने नटलेले कास पठार मन मोहून टाकते. ठोसेघर धबधबा साताऱ्यातील हा धबधबा पावसाळ्यात सर्वाधिक आकर्षक दिसतो. निसर्गप्रेमींसाठी हा एक परफेक्ट वीकेंड स्पॉट आहे.
माळशेज घाट ढग, धबधबे आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे माळशेज घाट खास बनतो. फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण उत्तम आहे. भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील बेस्ट ठिकाण म्हणजे भंडारदरा. येथील धुक्याने वेढलेला तलाव आणि हिरवीगार टेकड्या मन प्रसन्न करतात.
 कुने धबधबा लोणावळ्यातील प्रसिद्ध तीन-स्तरीय धबधबा पावसाळ्यात जीवंत होतो.  

ताम्हिणी घाट

पावसाळ्यात असंख्य धबधबे आणि हिरवाईने ताम्हिणी घाट खुलून दिसतो. रोड ट्रिपसाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय ठिकाण. आंबोली घाट महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. धुकं आणि धबधब्यांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.  राजमाची किल्ला ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी पावसाळ्यातील आवडते ठिकाण. हिरव्यागार डोंगररांगांमधून अविस्मरणीय अनुभव मिळतो.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा