Saturday, June 27, 2026

Lock Upp 2 : 'लॉकअप २'मध्ये रंगणार सेलिब्रिटींचा थरार! १५ स्पर्धकांची संपूर्ण यादी आली समोर

Lock Upp 2 : 'लॉकअप २'मध्ये रंगणार सेलिब्रिटींचा थरार! १५ स्पर्धकांची संपूर्ण यादी आली समोर

'Lock Upp 2' : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लॉकअप २ (Lock Upp) पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दुसऱ्या सीझनची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. यंदा शोची थीम 'सच या सज़ा' अशी ठेवण्यात आली असून, स्पर्धकांना केवळ टास्कच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक आणि वादग्रस्त गोष्टींनाही सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

यंदाच्या पर्वाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-कोरिओग्राफर फरा खान (Farah Khan) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या दोघांची जोडी पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या रिअॅलिटी शोचं होस्टिंग करताना दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

लॉन्च इव्हेंटमध्ये पहिल्या स्पर्धकांची घोषणा

मुंबईत नुकत्याच झालेल्या भव्य लॉन्च इव्हेंटमध्ये शोमधील पहिल्या काही स्पर्धकांची अधिकृत घोषणा करण्यात आली. सर्वप्रथम अभिनेता राम कपुर (Ram Kapoor) यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर नेटफ्लिक्सच्या शो 'देसी ब्लिंग' मधून चर्चेत आलेली पामेला सेरेना (Pamela Serena) हिचीही शोमध्ये एन्ट्री निश्चित करण्यात आली.

'ये रिश्ता क्या कहलाता फेम' अभिनेत्री शिवांगी जोशी हिचे. शिवांगीने अनेक वर्षे टीव्ही इंडस्ट्रीत यशस्वी कारकीर्द घडवली असली तरी ती फारशी वादांच्या भोवऱ्यात अडकलेली नाही. त्यामुळे अशा वेगळ्या फॉरमॅटच्या शोमध्ये ती स्वतःला कशी सिद्ध करणार, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

Splitsvillaची वादग्रस्त जोडीही होणार बंदिस्त

यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली एन्ट्री म्हणजे Splitsvilla मधील वादग्रस्त जोडी आकांक्षा चौधरी आणि योगेश रावत यांची. Splitsvillaमध्ये दोघांमध्ये झालेले वाद, आरोप-प्रत्यारोप आणि शो संपल्यानंतरही सुरू राहिलेली चर्चा यामुळे ही जोडी पुन्हा एकदा एकाच शोमध्ये दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. याशिवाय अभिनेता गोविंदा (Govinda) यांची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) हिचीही शोमध्ये एन्ट्री निश्चित झाली आहे. तिच्या सहभागामुळे शोमध्ये आणखी रंगत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'लॉकअप २'मधील १५ स्पर्धकांची यादी

यंदाच्या पर्वात एकूण १५ सेलिब्रिटी सहभागी होणार असून, पुढील सहा आठवडे हे सर्व स्पर्धक स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी विविध टास्क आणि आव्हानांना सामोरे जाणार आहेत.

Lock Upp Season 2 – १५ स्पर्धकांची नावं आली समोर

राम कपूर

श्रेया कालरा

आकांक्षा चौधरी

योगेश रावत

रियाज अली

श्रेष्ठा अय्यर

सूफी मोतीवाला

आकांक्षा चमोला

वरुण यादव

धीरज धूपर

हर्षद चोपडा

सुनीता आहुजा

पामेला सेरेना

शिवांगी जोशी

माधुरी ग्रोव्हर

कधी आणि कुठे पाहता येणार शो?

'लॉकअप सीझन २'चा प्रीमियर २७ जून रोजी होणार आहे. हा शो प्रेक्षकांना शनिवार ते बुधवार दररोज रात्री ८ वाजता Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नवीन थीम, वेगळे टास्क, चर्चेतले सेलिब्रिटी आणि वादांनी भरलेला हा सीझन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >