Sunday, June 28, 2026

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरण, तीन आरोपींना पोलीस कोठडी

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरण, तीन आरोपींना पोलीस कोठडी

ठाणे/भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी भिवंडी परिसरात कारवाई करत राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज सिंग या तिघांना अटक केली आहे. रविवारी (२८ जून) त्यांना भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीश एस. एम. सुतार(S. M. Carpenter) यांनी त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासातून हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, ते आंतरराज्यीय टोळीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटकेतील आरोपींपैकी धीरज बलराज सिंग (२८) हा हरियाणाचा, तर राजीव साव (४५) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (३०) हे बिहारचे रहिवासी आहेत. हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. प्राथमिक तपासात त्यांनी दीड कोटी रुपयांना टीईटीची प्रश्नपत्रिका विकण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या टोळीतील आणखी दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. "पेपर नेमका कुठून आला, महाराष्ट्रात आणखी कुठे याची विक्री झाली का, आर्थिक व्यवहार कोणाशी झाले आणि या रॅकेटचे मोठे जाळे काय आहे," हे शोधणे गरजेचे असल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे(Dr. Victory Marathas) यांनी न्यायालयासमोर मांडले. दरम्यान, आरोपी धीरज सिंगच्या वकिलांनी त्याला आरोग्याच्या समस्या असल्याचे सांगून वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर, पोलिसांनी आरोपींना आवश्यक वैद्यकीय उपचार दिले जात असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पेपरफुटी प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली असून, ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा