Saturday, December 6, 2025

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवादरम्यान सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चून भरसमुद्रातून १७ किलोमीटरचा सागरी सेतू उभारला जात आहे. त्याचे आतापर्यंत २२ टक्के काम झाले आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत सागरी सेतूचे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. तसेच सागरी सेतूला ९.६ किलोमीटर लांबीचे एकूण चार कनेक्टर असून, त्याचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

वरळी-वांद्रे सी लिंकला लागूनच पुढे वर्सोव्यापर्यंत सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार २०१८ मध्ये या सागरी सेतूच्या उभारणीसाठी पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार २०१९ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले होते.

मात्र जुहू, वर्सोवा कनेक्टरच्या एक्झिटमध्ये करण्यात आलेला बदल, मच्छीमारांचा व्यवसाय बाधित होऊ नये, यासाठी पुलाच्या आराखड्यात केलेल्या बदलाचा सुरुवातीला कामावर परिणाम झाला होता. तसेच पावसाळ्यात काम पूर्ण थांबवावे लागत असले तरी गेल्या दोन वर्षांत हिवाळा आणि उन्हाळ्याच्या आठ महिन्यांत एमएसआरडीसीकडून वेगाने काम केले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले. जूनपर्यंत त्यामध्ये मोठी प्रगती होणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >