मुंबई : राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात खांदेपालट करत चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विविध विभागांतील आयएएस अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देत, शासकीय कामकाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या आदेशानुसार, श्रीधर दुबे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यजित बडे यांची दिव्यांग आयुक्त (पुणे) म्हणून बदली करण्यात आली आहे. डॉ. सुनील भोकरे यांच्याकडे नागरी आरोग्य आयुक्त (मुंबई) या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, राहुल कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.






