Thursday, September 18, 2025

दिल्लीला धडक मारायला आलात तर डोक्याविना दिसाल

दिल्लीला धडक मारायला आलात तर डोक्याविना दिसाल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा संजय राऊतांना इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कमला डेलकर या निवडून आल्या. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्या निवडून आल्यानंतर शिवसेनेकडून पहिल्यांदाच राज्याबाहेर शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याचा दावा केला गेला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊतांना इशारा दिला आहे. दिल्लीला धडक मारायला आलात तर राऊत डोक्याविना दिसतील, असे राणे यांनी ठणकावून सांगितले.

आम्हाला पोटनिवडणुकीत मोठे यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार, असे शिवसेना म्हणतेय. मोदींचं सरकार ३०३ जागांसह बहुमतात आहे. तुम्ही एका जागेनिशी धडक मारणार म्हणताय. पण धडक कशी असते हे तुम्हाला माहिती नाही. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली.

एक तर तुम्ही जे ५६ आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडून आलेला आहात. नाहीतर आठच्या वर जात नाहीत तुम्ही. अनेक वृत्तपत्रांनी केलेल्या अभ्यासात आठच आकडा होता. मोदींशी आधी युती केली आणि नंतर गद्दारी केली. त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं. सध्या आकसापोटी मोदींवर टीका केली जात आहे. मोदींमुळे यांचे ५६ आणि १८ निवडून आले. पुढच्या लोकसभेला यांचे २५ आणि आठही निवडून येणार नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे तोपर्यंत हात धुवून घ्या असं चाललंय, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment