क्रान्स-माँटाना : जगभरात २०२६ च्या स्वागताचा जल्लोष सुरू असतानाच स्वित्झर्लंडमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. क्रान्स-माँटाना शहरातील प्रसिद्ध 'ले कॉन्स्टेलेशन' (Le Constellation) या बारमध्ये नवीन वर्षाच्या पार्टी दरम्यान भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
Update-
Several people have been killed and others injured when an #explosion ripped through a bar in the luxury Alpine ski resort town of Crans #Montana, Swiss police say. It is being said that the #fire broke out during the New Year's #fireworks.#Switzerland #Breaking pic.twitter.com/Iq6LEbrir8 — Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) January 1, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत या पबमध्ये पर्यटकांची आणि स्थानिकांची प्रचंड गर्दी होती. मध्यरात्री १.३० च्या सुमारास, जेव्हा लोक उत्सवाच्या धुंदीत होते, तेव्हा अचानक एका जोरदार स्फोटाने हा परिसर हादरला. स्फोट इतका भीषण होता की काही सेकंदातच संपूर्ण पबला आगीने वेढले. कोणालाही सावरण्याची किंवा बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, परिणामी पबमध्ये एकच धावपळ आणि किंकाळ्या ऐकू आल्या.
“पत्राचाळीत मराठी माणसाला कुणी देशोधडीला लावलं?” मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात ...
मृतांची संख्या आणि बचावकार्य
या भीषण आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर बरीच लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे हा स्फोट झाला की गॅस गळतीमुळे, याचा तपास स्विस पोलीस करत आहेत. 'ले कॉन्स्टेलेशन' हा बार शहरातील पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने तिथे सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, याचीही चौकशी केली जात आहे. या घटनेचे अत्यंत भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आनंदात असलेल्या अनेक कुटुंबांवर या दुर्घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये अनेक परदेशी पर्यटकांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.






