२०२६ मध्ये भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था झाला आहे आणि त्याने जपानलाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, भारताने हे यश टॅरिफच्या सावटात मिळवले. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन ४.१८ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे.
भारताने महागाई नियंत्रणात ठेवली आहे आणि बेरोजगारी कमी होत आहे. मोदी यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे निर्यातीत सुधारणा झाली आणि भारताचा आयात-निर्यात समतोल सुधारला. भारत आता जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला. अगदी काही वर्षांपूर्वी भारत हा जगातील सर्वात मागास देशांपैकी एक होता आणि येथील जीडीपी साडेतीन टक्क्यांच्या वर कधी जात नव्हता. हा काळ तो होता जो देश डावे आणि मध्यममार्ग यांच्या कचाट्यात सापडला होता आणि इंदिरा गांधी यांच्या काळात तर सरकार डाव्यांच्या मगरमुठीत होते. पण ज्यावेळी मोदी सत्तेवर आले आणि तेव्हापासून भारताच्या अर्थव्यवस्थेने कात टाकण्यास सुरुवात केली आणि आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. मुडीजच्या अनुसार भारत २०२६ मध्ये ६.४ आणि २०२७ मध्ये ६.५ च्या गतीने वाढू शकेल, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताची गती २०२६ मध्ये ६.२ टक्के इतकी असेल असा अंदाज लावला आहे. अर्थात भारताची प्रगती सर्वत्र दिसते आणि रस्ते, सुविधा, लोकांचे जीवनमान कसे सुसह्य होईल हे मोदी सरकारने पाहिले. एकेकाळी जो देश हत्ती आणि सापांचा देश म्हणून ओळखला जात होता, त्या देशाने इतकी मोठी झेप घेणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. याचे श्रेय निःसंशय मोदी यांना आहेच. पण भारताची जनता आणि येथील नागरिकांनाही आहे. काँग्रेसला हे मान्य नाही आणि त्यामुळे रशिद अल्वी यांनी ही बातमीच संपूर्ण चुकीची आणि निराधार आहे असे म्हटले आहे. काँग्रेसच्या काळात भारताने कधीही जीडीपी टक्क्यांच्या वर गेला नव्हता. आज तो ८ टक्क्यांच्या वर आहे आणि हे काँग्रेसला कसे पाहावणार. एवढ्यावरच भारताची प्रगती थांबणार नाही.
२०३० पर्यंत भारत आता जर्मनीला मागे टाकण्याचा अंदाज आहे. ही भारतासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे. अर्थात या आकडेवारीवरून भारतातील लोक सुखी आहेत की नाहीत याचा अंदाज येऊ शकत नाही, पण आकडेवारी ही एक प्रकारे मानदंड असते आणि त्यावरून असा निष्कर्ष काढता येतो, की लोक सुखी असू शकतात. २०३० पर्यंत भारताचा जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादनाचा आकडा ७.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल. आकडेवारी नीरस वाटू शकेल. पण भारताची प्रगती तर डोळ्यांना दिसते आहे आणि आज लोक सुखी जीवनमान जगत आहेत आणि त्यांच्याबरोबर महागाई नियंत्रणात आहे आणि बेरोजगारी कमी झाली आहे. अगदी पूर्वी म्हणजे १९५० ते १९८० च्या काळात भारताचा प्रगतीचा वेग मंद होता आणि तो एक टक्क्यांपेक्षा कमी होता. नंतरच्या दशकात गरिबी घटली आणि विकासदराने लक्षणीय झेप घेतली. काँग्रेस सरकारप्रमाणे गरिबी हटाव अशा घोषणा न देताही मोदी सरकारने गरिबी घटवली आणि रोजगारी वाढवली. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले आणि तरीही चीनच्या तुलनेत भारताची कामगिरी कमीच राहिली, पण आता भारत जपानला मागे टाकून चौथ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनला आहे आणि यापुढचे लक्ष्य आहे ते जर्मनीला मागे टाकण्याचे.
गेल्या काही वर्षांत अनेक शहरे जी कधीही प्रतिनिधींचे गंतव्यस्थान नसते ती आता गंतव्यस्थान बनले आहे आणि याचे उदाहरण आहे उत्तर प्रदेश भारताची वृद्धी. साडेसहा टक्क्यांनी राहिली तर जगाची वृद्धी ही तीन टक्क्यांच्या आसपास राहिली. याचा अर्थ जागतिक वृद्धी दरातील भारताचा वाटा १५ टक्के इतका मोठा राहील. २०१३ मध्ये भारत, इंडोनेशिया, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या पाच देशांना तकलादू अर्थव्यस्था म्हणून समजले जात होते. पण आज त्यातून भारत कधीच बाहेर निघाला आहे. भारताला सतावत होता तो प्रश्न बॅलन्स ऑफ पेमेंट्सचा. पण आज त्यावर भारताने मात केली आहे आणि मोदी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारतातील सामान्य लोकही उद्योजक होत आहेत आणि भारताचे सर्वसामान्य लोक आपले उद्योग चालवतात आणि त्यांच्यावर कित्येक लोक अवलंबून राहतात. भारताचे परकीय भांडवलावरील अवलंबित्व कमी झाले आहे आणि मोदी सरकारने सामान्यांच्या बँक खात्यांची संख्या वाढवल्यामुळे लोकांनां बँकिंगच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. याचाच अर्थ असा की, लोकांना आता सुख-सुविधा उपलब्ध होत आहेत आणि त्यांमुळे त्यांचा सुखी होण्याचा इंडेक्स वाढतो आहे. अजूनही काही उणिवा आहेत. त्या म्हणजे देशांतर्गत मागणी कमी असणे, मोठ्या प्रमाणात देशात असलेली गरिबी आणि उत्पादनांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध न होणे. हे तीन निसरडे घटक आहेत पण यावर मात करून भारत लवकरच जर्मनीला मागे टाकून आपले उद्दिष्ट साध्य करेल यात काही शंका नाही. भारताची आर्थिक झेप हे स्वप्न होते आणि ते आता साध्य झाले आहे. पण याहून अधिक स्वप्ने पाहण्याचे बळ मोदी यांनी भारताला दिले आहे. २०४७ मध्ये विकसित भारत बनवण्याची योजना मोदी यांनी आखली आहे. त्या दृष्टीने मोदी यांना यश येणार यात काही शंका नाही. भारताची आर्थिक झेप हे त्यांच्या योजनेचे पहिले पाऊल आहे. आगामी अडीच ते तीन वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून तिसरी अर्थात सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे आकडे सांगतात. गेल्या दहा वर्षांत भारताचा अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला आहे. याच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसमावेशक शोधक दृष्टी आहे.






