Saturday, May 11, 2024
Homeक्रीडाRohit Sharma MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा नसणार याची खुद्द...

Rohit Sharma MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा नसणार याची खुद्द रोहितला नव्हती कल्पना?

हार्दिक पांड्याच्या निवडीवर MI चे चाहते नाराज, सगळीकडे फॉलोवर्स घटले!

मुंबई : क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup) भारताच्या निराशाजनक पराभवानंतर सर्व क्रिकेटप्रेमींना आयपीएलची (IPL) उत्सुकता होती. मात्र, आता आयपीलमध्ये मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) चाहते सामने सुरु होण्यापूर्वीच नाराज झाले आहेत. याचं कारण म्हणजे आयपीएल ज्या व्यक्तीसाठी पाहायची होती, तो रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नसणार आहे. त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड करण्यात आली आहे. यामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. त्यातच आता रोहित शर्माला या बदलाबाबत काही कल्पना होती की नाही, याविषयी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला वर्ल्डकपच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून आगामी हंगामासाठी परत आणण्याच्या निर्णयाबाबत माहिती दिली होती. पांड्याने गुजरात टायटन्समधून (Gujrat Titans) मुंबईत पुन्हा येण्यासाठी एका अटीवर सहमती दर्शवली होती ती म्हणजे, त्याला फ्रँचायझीचा कर्णधार बनवले जाईल. हार्दिक पांड्या पुन्हा एमआयमध्ये (MI) परतल्यापासूनच चाहत्यांमध्ये याविषयी चर्चा सुरु होती आणि शुक्रवारी यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे कल्पना असूनही काहीसा धक्कादायक ठरलेला हा निर्णय चाहत्यांच्या खूपच जिव्हारी लागला आहे.

मुंबई इंडियन्सचे फॉलोवर्स सगळीकडेच घटले

रोहित शर्माची निवड न झाल्याने सोशल मीडियापासून ते प्रत्यक्षही अनेकांनी मुंबई इंडियन्सवर कडकडून टीका केली आहे. तब्बल चार लाख चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचं इन्स्टाग्राम (Istagram) अकाऊंट अनफॉलो केलं असून त्यात अधिकाधिक भरच पडताना दिसत आहे. दुसरीकडे यूट्यूब (Youtube) वरून १० हजारहून अधिक लोकांनी मुंबई इंडियन्स संघाच्या चॅनेलला अनसब्सक्राइब (Unsubscribe) केलं आहे. सुमारे ३३ हजार चाहत्यांनी एक्सवर (X) मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले आहे.

मुंबई इंडियन्सनेही रोहित शर्मासाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून आत्तापर्यंतच्या वाटचालीचा प्रवास दर्शवणारा व्हिडीओही आहे. शिवाय तू कायमच आमचा कर्णधार राहशील, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हार्दिक पांड्या घरवापसी बद्दल आनंदी

दुसरीकडे, हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्सचा संघ सोडून २०२१ मध्ये गुजरात टायटन्समध्ये प्रवेश घेऊन कर्णधार झाला होता, त्यानेही गुजरातला पहिल्याच वर्षी जेतेपद मिळवून दिले, सीएसके सारख्या बलाढ्य संघासमोर मिळवलेला विजय आणखीनच खास ठरला. यंदाच्या आयपीएल लिलावाच्या पूर्वी जेव्हा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या संघात परतला, तेव्हा त्यानेही या घरवापसी बद्दल आनंद व्यक्त केला होता. “२०१५ पासून माझा मुंबई इंडियन्ससह क्रिकेटचा प्रवास सुरु झाला आता पुन्हा मुंबईत आल्यावर १० वर्षांचा संपूर्ण कालावधी डोळ्यासमोरून जातो आणि तो माझ्यासाठी खूप खास आहे. मी जिथून सुरुवात केली तिथेच आलो आहे.” असं पांड्या म्हणाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -