Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीपुनर्वसन खात्याने एकाच व्यक्तीला दोनदा जमीन दिल्याची चौकशी पूर्ण

पुनर्वसन खात्याने एकाच व्यक्तीला दोनदा जमीन दिल्याची चौकशी पूर्ण

सोलापूर  – जिल्हा पुनर्वसन कार्यालयाने सोलापुरातील एकाच लाभार्थ्यास दोन वेळा जमिनी दिल्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून जबाबदारी निश्चित करण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच दिली.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी चौकशी केली आहे. सखाराम कदम यांना दुबार जमीन वाटप झाली. याबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे. सखाराम कदम यांना दुबार जमीन वाटप व वाडकर यांना जमीन वाटप आदेश या दोन्ही मुद्यांची चौकशी केली आहे.

प्रकल्पग्रस्त व्यवहारे यांना जमीन वाटप प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. प्रकल्पग्रस्ताने मागणी केलेल्या क्षेत्रापैकी काही क्षेत्र अन्य प्रकल्पग्रस्तास वाटप झालेले आहे. पण अर्जदारांनी त्रुटी पूर्तता झाल्यानंतर पात्रतेनुसार पर्यायी जमीन वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -