Wednesday, May 8, 2024
HomeदेशPM Modi's Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७३ वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा...

PM Modi’s Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७३ वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १७ सप्टेंबरला आपला ७३वा जन्मदिवस साजरा करत आहे. संपूर्ण भारतात भाजपकडून पंतप्रधान मोदींचा जन्मदिवस विविध पद्धतीने साजरा केला जात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी १७ सप्टेंबर १९५०ला त्यांचा जन्म झाला. दामोदरदास मोदी आणि हिराबा मोदी यांचे नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहे.

आपल्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. १९७०च्या दशकात राजकारणात सामील झाल्यानंतर १९९० च्या दशकाअखेरीसपर्यंत त्यांच्या राजकीय करिअरला खास वेग मिळाला नव्हता.

१९८७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये भाजपाचे महासचिव म्हणून काम पाहण्यास सुरूवात केली. १९९५मध्ये पक्षाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले आणि ते वेगाने पुढे जाऊ लागले. ७ ऑक्टोबर २००१ला नरेंद्र मोदी यांनी पहिली संविधानिक भूमिका निभावली. ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात दीर्घकाळ सेवा करणारे गैर-काँग्रेसी पंतप्रधान आहे. तर एक निर्वाचित सरकारचे प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ दीर्घ आहे. २०१४ममध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि तीन दशकांमध्ये पहिल्यांदा बहुमत मिळवणारा पक्ष ठरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दुसरा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार आहे. मात्र मोदींचा जलवा भारतात अद्यापही कायम आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताने बरीच प्रगती केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून तसेच जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक केंद्रीय नेते पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आहेत.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -