Sunday, April 28, 2024
Homeदेशकॉपी केल्याने आयुष्य घडत नाही : पंतप्रधान मोदी

कॉपी केल्याने आयुष्य घडत नाही : पंतप्रधान मोदी

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कष्टकरी मुलांना काळजी वाटते की मी मेहनत करतो आणि काही लोक चोरी करून त्यांची कामे करून घेतात. मूल्यांमधील हा बदल समाजासाठी घातक आहे. आता जग बदलले आहे. आज प्रत्येक पावलावर परीक्षा आहे. कॉपी केल्याने आयुष्य घडवता येत नाही, असे मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी २७ जानेवारी रोजी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून ३८ लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संवादात्मक सत्रादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी परीक्षेचा ताण टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांना गुरुमंत्रही दिला. मोदी म्हणाले की, ‘परीक्षा पे चर्चा’ ही माझीही परीक्षा आहे. देशातील करोडो विद्यार्थी माझी परीक्षा देत आहेत. मला ही परीक्षा देताना आनंद होतोय. कुटुंबांना आपल्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु केवळ सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी असेल तर ते धोकादायक ठरते.

मोदी म्हणाले की, तुमच्याप्रमाणे आम्हालाही आमच्या राजकीय जीवनात अशा दबावाचा सामना करावा लागतो. निवडणुकीत कितीही चांगले निकाल लागले तरी नेहमीच चांगले परिणाम अपेक्षित असतात. विद्यार्थ्यांनो काळजी करू नका, फक्त आरामशीर आणि आनंदी राहून तुम्ही सर्वोत्तम ते देण्याचा प्रयत्न करा. पण दबावाला बळी पडू नका. फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या, तुम्हीही संकटातून बाहेर पडाल.

मोदी पुढे म्हणाले, स्वतःमध्ये पाहा आणि आत्मपरीक्षण करा. तुम्ही तुमची क्षमता, तुमच्या आकांक्षा, तुमचे ध्येय ओळखले पाहिजे आणि मग त्यांना इतर लोकांच्या अपेक्षांनुसार संरेखित करण्याचा प्रयत्न करा.
वेळेचे व्यवस्थापन शिका

केवळ परीक्षेसाठीच नाही तर जीवनातही वेळेच्या व्यवस्थापनाचे भान ठेवायला हवे. कामे रखडतात, कारण त्यांना वेळेवर पूर्ण केले नसते. काम केल्यावर कधी थकवा जाणवत नाही, उलट समाधान मिळते. काम न केल्याने थकवा जाणवतो. असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले.

या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी मिळाली. विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -