Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाICC Rankings: आशिया चषक जिंकल्यानंतर भारताला मोठा झटका

ICC Rankings: आशिया चषक जिंकल्यानंतर भारताला मोठा झटका

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक २०२३ दिमाखात उंचावला. भारताने या सामन्यात श्रीलंकेला १० विकेटनी हरवले. मात्र या विजयानंतरही भारताला आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत(icc  ranking) मोठा झटका बसला आहे. खरंतर, पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल संघ ठरला आहे.

आशिया चषकच्या सुपर ४मध्ये सगळ्यात खाली राहणाऱ्या पाकिस्तानने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली. पाकिस्तानला द. आफ्रिकेच्या विजयाने मोठा फायदा झाला. ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात खेळवलेल्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात आफ्रिकेने १२२ धावांनी शानदार विजय मिळवत एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन असलेल्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकलले आणि पाकिस्तान पुन्हा एकदा नंबर वन बनण्यात यशस्वी ठरला.

दुसऱ्या स्थानावर आहे भारत

टीम इंडिया आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताकडे ११४.६५९ पॉईंट आहेत. तर पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या संघाकडे ११४.८८९ रेटिंग आहेत. आशिया चषकानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला या क्रमवारीत नंबर वन बनण्याची संधी आहे. तसेच या मालिकेच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा एकदा नंबर वन बनू शकतो.

इतर संघाचे हे स्थान

एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान नंबर वन, भारत दुसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलियाचा संघ ११३ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय द. आफ्रिका १०६ रेटिंगसह चौथ्या स्थानावर तर इंग्लंड संघ १०५ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -