Sunday, May 5, 2024
Homeदेशसावधान! कोरोनाचे नवे व्हेरियंट महाराष्ट्रात

सावधान! कोरोनाचे नवे व्हेरियंट महाराष्ट्रात

मुंबई, महाराष्ट्रातली वाढ चिंताजनक!

नवी दिल्ली/मुंबई : कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर ऐन दिवाळीच्या तोंडावर नव्या व्हेरियंटने डोके वर काढले आहे. यामध्ये कोरोनाचा नवा एक्सबीबी सब व्हेरिएंट, बीए.५.१.७ आणि बीएफ.७ यांचा समावेश आहे. हे विषाणू अधिक घातक नसले तरी त्यांची पसरण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे तज्ज्ञही खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांच्या मते दिवाळीच्या आधी आणि नंतर सणावारांमुळे बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात.

ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट ‘एक्सबीबी’ने भारतात आधीच शिरकाव केला आहे. केरळसह देशातील काही राज्यांत या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही नव्याने आढळणाऱया रुग्णांमध्ये या व्हेरिएंटची लक्षणे दिसून येत आहेत. त्यातच पुणे येथे ओमायक्रॉनच्या आणखी दोन नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. सोमवारी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल आले असून त्यात ओमायक्रॉन बीए.२.३.२० आणि बीक्यू.१ या दोन नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून देशातील या व्हेरिएंटचे हे पहिलेच रुग्ण ठरले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत १७.७ टक्क्यांनी वाढ झाली असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मुंबईमध्ये गेल्या ३ दिवसांमध्ये कोरोनाचे १५० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून दररोज १० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याने तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. केवळ मुंबईतच नाही तर देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

मुंबईतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईमध्ये इन्फ्लूएंजासारख्या आजारांवरही बारीक नजर ठेवली जात आहे. हा आजारही संसर्गजन्य आहे.

दरम्यान, काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल तरी ते त्याला सामान्य सर्दी खोकला समजून कोरोना चाचण्या टाळू शकतात. त्यामुळे तोपर्यंत हा विषाणू इतरांकडे पसरलेला असेल. तज्ज्ञांच्या मते कोरोनामुळे बचावासाठी खबरदारी बाळगली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -