Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीJay Pawar : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जय पवार अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला

Jay Pawar : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जय पवार अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला

गुपचूप भेटीमागील कारण काय?

जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे देखील बारामतीकडे जनतेची विशेष नजर आहे. या ठिकाणी पवारांमध्येच अटीतटीचा सामना होणार असून त्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांकडून (Ajit Pawar) एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांनी आज सकाळी अचानकपणे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून या गुपचूप भेटीमागील नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार असल्याचा थांगपत्ता कोणालाही लागू न देता जय पवार आज सकाळी मुंबईतून हेलिकॉप्टरने थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. तेथून कारने ते अंतरवाली सराटी येथे पोहोचले. याठिकाणी जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली. यानंतर आगतस्वागतचा कार्यक्रम पार पडला. जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. मात्र, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे ते माध्यमांवर बराच काळ चर्चेत होते. त्यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारने अखेर त्यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षण देऊ केले. मात्र, त्यानंतर जरांगेंच्या मागण्या बदलत गेल्या. शिवाय या मागण्या मान्य करत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. या प्रकारामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला. तर सरकारनेही त्यानंतर जरांगेंना गांभीर्याने घेतले नाही. जरांगेंचं आंदोलन काही काळ थांबलं. तेव्हापासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, आज अजित पवार यांचे चिरंजीव अचानक मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचल्याने यामागे नेमके काय कारण असावे, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -