Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणजैतापुर अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतली ५०० कोटींची सुपारी!

जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतली ५०० कोटींची सुपारी!

उद्धव ठाकरे, कोकणात आल्यास पळता येईल का, याचाही विचार करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी ५०० कोटींची सुपारी घेतली. त्यापैकी ठाकरेंनी ५ कोटी रुपये आगाऊ घेतले आणि ५०० कोटी रुपये नंतर देण्याचे ठरले होते, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे बारसूमध्ये आल्यास त्यांना पळता भुई थोडी होईल, असे थेट आव्हान राणे यांनी दिल्याने ठाकरे गोटात खळबळ उडाली आहे.

आज पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते व केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंनीच खोके घेतले. त्यामुळे दुसऱ्यांवर खोके म्हणून टीका करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही, असे खडेबोल राणेंनी यावेळी सुनावले.

राज्यात जेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत चाचपणी सुरु होती तेव्हा कोळशावर वीजनिर्मिती करणारे ३४ उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले होते. जैतापूरचा प्रकल्प होऊ नये, यासाठी या उद्योजकांनी उद्धव ठाकरेंसोबत ५०० कोटींचा व्यवहार केला होता. त्यावेळी ठाकरेंनी ५ कोटी रुपये आगाऊ घेतले आणि ५०० कोटी रुपये नंतर देण्याचे ठरले होते, असा खूलासा केला.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, जैतापूर ऐवजी बारसूला रिफायनरी व्हावी म्हणून ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणाला विचारुन पत्र दिले? बारसू येथील उर्जा प्रकल्पाला आता ठाकरे गटाने विरोध केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बारसूमध्ये येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार आहेत असे समजते. तर मग आम्ही कोकणातच आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावे, असे आव्हान देखील नारायण राणे यांनी दिले आहे. सोबतच आपल्याला पळता येईल का याचाही विचार करावा कारण मुंबईपर्यंत त्यांना पळत जावे लागेल. ज्यांना चालताही येत नाही, त्यांनी पळण्याचा विचारही करू नये, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -