Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीडहाणूत ग्रामपंचायत निवडणूकीत संमिश्र प्रतिसाद

डहाणूत ग्रामपंचायत निवडणूकीत संमिश्र प्रतिसाद

चिंचणी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व

डहाणू : डहाणू तालुक्यात १७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी थेट सरपंचपदासाठी आणि १९७ सदस्यपदासाठी सोमवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत गटागटात विखुरल्या गेलेल्या राजकीय पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, सर्वांत मोठ्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीवर भाजपने पहिल्यांदाच आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला एकही जागा मिळविता आलेली नाही, तर भाजपने मिळविल्या यशाचे श्रेय जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत यांना देण्यात येत असून, त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सोमवारी झालेल्या १७ ग्रामपंचायत मतमोजणीप्रमाणे विविध राजकीय पक्षांनी दावा केल्याप्रमाणे पक्षीय बलाबल असे आहे, भाजप ४, माकप ४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३, मनसे १, उबाठा ४, अपक्ष व गाव पॅनल १.

थेट सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार राजकीय पक्षाने दावा केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीनुसार

सावटा – महाद्या बेंदर (भाजप), चिंचणी – मेघा शिंगडे (भाजप), दाभोण – हर्षला दळवी (भाजप), जांबुगाव – प्रेमा करबट (भाजप);

किन्हवली – शेलु दुमाडा (माकप), दाभाडी – पार्वती पिलेना (माकप), मोडगाव – रंजना चौधरी (माकप), सोगवे – लहानी दौडा (माकप);

आंबेसरी – गीता मोरघा (उबाठा), चारोटी – तेजस्वी कडू (उबाठा), गोवणे – अलका घोडा (उबाठा), वंकास – रुबीना तांडेल (उबाठा),

दापचारी – भारती भीमराव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), गांगणगाव – सविता पालकर (राकाँप शरद पवार गट),

राई – नवशा धोडी (मनसे),

बोर्डी – श्याम दुबळा(परिवर्तन पॅनल),

कापसी – कलावती रावते (अपक्ष) असे सरपंचपदी विराजमान झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -