Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीआंबा व्यावसायिक करणार गुरूवारी धरणे आंदोलन

आंबा व्यावसायिक करणार गुरूवारी धरणे आंदोलन

रत्नागिरी (वार्ताहर) : अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामात हापूस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांकडून गुरूवार २३ डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबा बागायतदार बावा साळवी यांनी दिली.शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तुकाराम घवाळी, दीपक राऊत आदी उपस्थित होते.

Mango traders will hold agitation on Thursday
कोकणातील आंबा, काजू, नारळ आदी फळबागायतींमधून शेतकरी व शेतमजूर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेकांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. गेली १५ वर्षे निसर्गाच्या बदलातून वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण, रासायनिक प्रदूषण यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजू आदी फळझाडांना चांगले मोहर आले असतानाच अवकाळी पाऊस पडून मोहरावर कीड, करपा, बुरशी व भुरी आदी रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या कष्टाने फळबागांचे संगोपन करून आंबा, काजू व्यवसायिकांनी पीक कर्जे घेतली.

निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे बँकामार्फत न्यायालयांकडून वसुलीचे मार्ग अवलंबून शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करण्याबाबतची कार्यवाही केली जात आहे. कर्ज पुनर्घटनेबाबतही शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असे बावा साळवी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -