Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यजाणून घ्या मानवी स्वभावातील चुकीच्या वृत्ती

जाणून घ्या मानवी स्वभावातील चुकीच्या वृत्ती

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

आज या लेखाच्या माध्यमातून आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या मानवी स्वभावातील चुकीच्या वृत्ती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

गिल्ट ट्रिप… : गिल्ट ट्रिपमध्ये समोरील व्यक्ती प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जबाबदार धरते. त्याच्या, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चुकीच्या गोष्टीला फक्त तुम्ही जबाबदार आहात, हे तुम्हाला असे पटवून दिले जाते की, तुम्हाला स्वतःची लाज वाटू लागते. जो व्हिक्टिम आहे, त्याला स्वतःचाच संशय यायला लागतो. चूक कोणाचीही असो. फक्त तुम्हाला जबाबदार धरून मोकळे होणे आणि तुमच्याच नजरेत तुम्हाला उतरवायचे, याला ‘गिल्ट ट्रिप’ असे म्हणतात.

आयसोलेशन : ज्याला आयसोलेटे करायचे त्याला अशी वागणूक दिली जाते की, माझ्यासोबत राहायचे असेल तर माझ्याच पद्धतीने, नियमाने राहायचे. इतरांच्या सर्व गोष्टी, वागणूक, हालचाली, सवयी कंट्रोल केल्या जातात. मी तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे, आपले नातं खूप जवळचं आणि प्रेमाचे आहे त्यामुळे तू फक्त माझे ऐकायचे आणि मी म्हणेल तसेच वागायचे, याला एखाद्याला आयसोलेटे करणे म्हणतात.

यामध्ये व्हिक्टिमला इतरांकडून कोणताही डाटा मिळाला नाही पाहिजे आणि त्याने आपल्यालाच १००% खरे समजले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातात. लव्ह बॉम्बिंग लव्ह बॉम्बिंग हे एक प्रकारचे सायकोलॉजिकल abus आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत खूप प्रेम, अटेंशन देत राहायचं, खूप वचन द्यायची, खूप जवळ करायचे, खूप स्वप्न दाखवायची.
ती व्यक्ती पूर्ण आपली झाली की demanding भूमिकेत जाऊन आपण दिलेल्या प्रेमाच्या बदल्यात तिच्याकडून अनेक अपेक्षा करायच्या. म्हणजेच कंडिशनल प्रेम करायचे याला म्हणतात लव्ह बॉम्बिंग.

‘प्लेयिंग द व्हिक्टिम’ अशा प्रकारे वागणारे लोक नेहमी व्हिक्टिम कार्ड प्ले करतात. मी किती सफर झालो आहे, मी किती स्ट्रगल केला आहे, मी किती सहन केला आहे, माझ्यावर खूप अन्याय झाला, कायम झाला हे सांगून मी जे वागतोय ते बरोब्बर आहे. मी इतके केले आहे, तुम्ही काय केले आहे? तुम्ही काय करता? असे बोलून इतरांना d humanize करणे. मी खूप वाईट परिस्थितीमधून गेलो हे सतत रंगवून सांगितले जाते. Threats or Coertion यामध्ये आपला चुकीचा हेतू साध्य करण्यासाठी दुसऱ्याला इमोशनल ब्लॅकमेल केले जाते. शक्यतो मी आत्महत्या करेल, घर सोडून जाईल, नाते तोडून टाकेल, सगळे संपवून टाकेल, हे अत्यंत भावनिक होऊन पण धमकीच्या स्वरूपात दबाव टाकून, भीती दाखवून सांगितले जाते. याला विक्टिम सहज बळी पडतो आणि समोरच्याची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे चालले आहे, ते सहन करतो अथवा तो सांगेल तस वागतो.

शेमिंग : यामध्ये शेमिंग करणारा विक्टिमचे मनोधैर्य, मनोबल, मानसिकता खच्चीकरण करण्यासाठी त्याला सामाजिक स्तरावर बदनाम करणे, त्याला लोकांसमोर, समूहात लोकांमध्ये अत्यंत अपमानास्पद वागणूक देणे, त्याच्या छोट्या चुकीला खूप मोठे करून लोकांसमोर मांडणे यासारखी वागणूक देतो. यामुळे विक्टिमला स्वतःची, स्वतःच्या वागणुकीची लाज वाटू लागते. Triangulation यामध्ये दोन व्यक्तींमधील वादाचा, भांडणाचा तिसरा व्यक्ती लाभ घेतो. तिसरी व्यक्ती जी triangulation करत आहे, ती असे दाखवणार की, मी भांडण मिटवण्याचा, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिथे समेट न होता वाद अधिक चिघळावा, हे त्याचे हेतू आणि प्रयत्न असतात.

सायलेंट ट्रीटमेंट : या पद्धतीने वागणारा व्यक्ती विक्टिमशी मुद्दाम वेगळे वागायला लागतो. बोलणे बंद करणे, एकदम शांत राहणे, कामापुरता संबंध ठेवणे, काय झाले, काहीच स्पष्ट न सांगणे. यामुळे विक्टिम आपले काय आणि कुठे चुकले, हा विचार करत बसतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. Passive aggressive behavior (Aggressive jockes) यामध्ये नेहमी नॉर्मल, व्यवस्थित वागणारा व्यक्ती अचानक आणि मध्येच खूप विचित्र वागतो, विक्टिमला खूप त्रास होईल, असे बोलतो, विक्टिम डिस्टर्ब होईल अशी ट्रीटमेंट देतो. अनेकदा विक्टिमला वाटते, त्याचा मूड नसेल, तो रागात किंवा दुसऱ्या विचारात असेल म्हणून असे वागला. पण अनेकदा हे समोरच्या समोर आपले महत्त्व वाढविण्यासाठी ठरवून केलेले manipulation असते.

प्रोजेक्शन : यामध्ये प्रोजेक्शन करणारा स्वतःच्या चुका मान्य करतो, स्वतःला गुन्हेगार समजतो. पण त्यासाठी इतरांना अथवा परिस्थितीला जबाबदार धरतो. आपलीच १००% चूक आहे आणि आपणच जबाबदार आहोत हे माहिती असूनही defence mechanism चा वापर केला जातो. या ठिकाणी स्वतःची रिअॅलिटी स्वीकारणे जमत नसल्याने ग्राउंड रिअॅलिटीला ब्लेम केला जातो.

डिफ्लेक्शन : यामध्ये व्यक्ती स्वतःच्या चुकांसाठी इतरांना जबाबदार धरते. त्याने तसे केले म्हणून मी असे केले, तो तसे वागला म्हणून मी असे वागलो, तो तसे बोलला म्हणून मीपण बोललो. अशा पद्धतीने आपल्या चुकीची ओनर शिप स्वतः न घेता ते इतरांवर ढकलने याला डिफ्लेक्शन म्हणतात.

बदनामीची मोहीम : यामध्ये दुसऱ्याची सामाजिक बदनामी मोठ्या प्रमाणावर केली जाते. एखाद्याचे व्यक्तिमत्त्व, व्यक्तिगत आयुष्य, त्याच्याबद्दलची थोडीशी चुकीची, पण अर्धवट उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर त्याची मोठ्या प्रमाणावर निंदा केली जाते. स्वतःचं गुडवील, स्वतःचा समाजातील नावलौकिक वाढविण्यासाठी इतरांना सामाजिक स्तरावर बदनाम करून स्वतःचा स्वार्थ साधला जातो. बदनामीची मोहीम त्यासाठीच वापरली जाते.

ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न : विक्टिम जेव्हा काही तक्रार करतो किंवा स्वतःला होणारा त्रास सांगतोय, तेव्हा त्याच्याकडे पुरावा मागितला जातो. तो जे सांगतोय, ते खूप किरकोळ आहे, त्यापेक्षा मोठे काही घडेल तेव्हा बघू, असे धोरण घेतले जाते. कोणत्याही चुकीच्या गोष्टीवर कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे विलंब जाणिवपूर्वक करण्याचा वापर करणे, म्हणजे शिफ्टिंग द गोल पोस्ट होय.

विषय बदलण्याचा प्रयत्न : जेव्हा एखाद्या व्यक्तीला सत्य परिस्थिती पचत नसते किंवा ऐकून आणि समजावून घ्यायची नसते, सत्य स्वीकारायचे नसते तेव्हा तो कोणाशीपण बोलताना मूळ विषय सातत्याने बदलतो, मूळ मुद्द्यापासून लांब जातो आणि इतरांना पण देतो. दुसऱ्याला डायवर्ट केले जाते, भलताच विषय आणि वेगळेच मुद्दे संभाषणात घुसवले जातात.

कमकुवत स्थांनावर प्रहार : यामध्ये समोरील व्यक्तीची कमजोरी, वीक पॉइंट पाहून त्याला वारंवार, वेळोवेळी त्याची जाणीव करून दिली जाते. सतत त्याच्या विकनेस, वीक पॉइंट्सवरून त्याला हिणवले जाते आणि नाउमेद केले जाते. त्यामुळे समोरच्याचे खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असतो.

सावधगिरी आवश्यक : यामध्ये आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती, पण ती कितीही हुशार असली, तिला तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असले, ती कितीही जबाबदार असली तरी त्या व्यक्तीला सातत्याने हीच जाणीव करून दिली जाते की ती वयाने लहान आहे. त्यामुळे तुला अक्कल नाही, तुला अनुभव नाही. अशा वृत्तीना वेळीच ओळखून आपण सतर्क आणि सावध राहणे आणि स्वतःला विक्टिम होण्यापासून वाचवणे आवश्यक आहे.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -