Saturday, May 11, 2024
Homeक्रीडाIPL 2024केकेआरचा गुजरातवर रोमहर्षक विजय

केकेआरचा गुजरातवर रोमहर्षक विजय

रिंकूची तुफानी खेळी

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : व्यंकटेश अय्यरच्या (८३ धावा) आणि नितिश राणा या जोडगोळीने कोलकाताला संकटातून सावरले. मात्र तरीही केकेआरसाठी विजय दूरच होता. रिंकू सिंगने अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडत कोलकाताला अनपेक्षित विजय मिळवून दिला. केकेआरने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत ३ विकेट राखून गुजरात टायटन्सवर सरशी साधली.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकाताचे सलामीवीर धावा जमवण्यात अपयशी ठरले. रहमनुल्लाह गुरबाज आणि नारायण जगादेस्सन हे सलामीवीर स्वस्तात परतले. व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार नितिश राणा यांनी संघाला सावरत विजयाच्या मार्गावर आणले. व्यंकटेशने ८३, तर नितिशने ४५ धावा जमवल्या. मात्र हे दोघेही बाद झाल्यावर केकेआरचा विजय कठीण झाला होता. दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या, तरीही रिंकू सिंगने फटकेबाजी काही थांबवली नाही. रिंकूने २१ चेंडूंत नाबाद ४८ धावा तडकावत केकेआरला अनपेक्षित विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीत १ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकातील अखेरच्या पाचही चेंडूंवर रिंकूने षटकारांची आतषबाजी करत केकेआरला विजय मिळवून दिला. गुजरातच्या राशिद खानने ३ बळी मिळवले, तर अल्झेरी जोसेफने २ विकेट मिळवल्या. यश दयाल मात्र सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ६९ धावा दिल्या.

विजय शंकर आणि साई सुदर्शन यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या बळावर गुजरातने निर्धारित २० षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात २०४ धावांचा डोंगर उभारला. विजय शंकरने झंझावाती फलंदाजी करत अखेरच्या षटकांत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विजयने २४ चेंडूंत ६३ धावांची वादळी खेळी खेळली. तर साई सुदर्शनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकाला गवसणी घातली. गुजरातचा संघ अडचणीत सापडला तेव्हा साई सुदर्शनने विस्फोटक अर्धशतक झळकावले. साईने ३८ चेंडूंत ५३ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील हे त्याचे दुसरे अर्धशतक होय. शुभमन गिलने ३९ धावांची जोड दिली. कोलकाताचा सुनिल नरिन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ३३ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडले. तर सुयश शर्माने एक बळी मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -