Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे‘हर हर महादेव’ चित्रपट वाद प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

‘हर हर महादेव’ चित्रपट वाद प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विटरवरही माहिती देत सरकारवर निशाणा साधला आहे.

आव्हाड म्हणाले की, हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही. आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटले कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -