Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीनितीन गडकरींना काळं फासण्याचा डाव?

नितीन गडकरींना काळं फासण्याचा डाव?

भाजप आमदारासोबतची ऑडिओ क्लीप व्हायरल

वर्धा : वेगळ्या विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव नाही, अशी माहिती केंद्राने लोकसभेत दिली होती. त्यानंतर विदर्भवादी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबतची एक ऑडिओ क्लीप समोर आली असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना काळं फासण्याचा डाव असल्याचे उघडकीस आले आहे. भाजप आमदार समीर कुणावार (Sameer Kunawar) आणि प्रवीण महाजन (Pravin Mahajan) या दोन व्यक्तींमधील ही क्लीप व्हायरल झाली आहे.

समीर कुणावार हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार आहेत. तसेच गडकरींचा रविवारी हिंगणघाट येथे कार्यक्रम होता. यावेळी गडकरींद्वारे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा केंद्रात पाठविण्याची मागणी प्रविण महाजन यांनी ऑडिओ क्लीपमध्ये केली आहे. आमच्याजवळ शाई असेल आणि आम्ही गडकरींना वेगळ्या विदर्भाची मागणी करू, असं महाजन भाजप आमदार समीर कुणावार यांना सांगतात. मात्र, या गोष्टी हिंगणघाटात नको, तुम्हाला नागपुरात जाऊन जे करायचे ते करा, असा सल्ला समीर कुणावार यांनी दिला आहे.

”आज सायंकाळी निवेदन घेऊन गडकरींकडे येत आहे. सोबत शाई आणणार आहे. तसेच त्यांना निवेदन देणार आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी गडकरींना तोंडी कळवणार आहे”, असं प्रविण महाजन बोलतात. त्यावर आमदार कुणावार म्हणतात, असं काहीही करू नका. त्यानंतर महाजन म्हणतात ”आम्हाला वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर मीडियापुढे स्टंट करायचा आहे. गडकरींची बदनामी करण्याचा उद्देश नाही. मंचाच्या खाली उभं राहून गडकरींना काळं फासून वेगळ्या विदर्भाचा दिल्लीत पाठवायचा आहे.” त्यानंतर आमदार कुणावार त्यांना समजावत असल्याचे या ऑडिओ क्लीपमधून समजते.

गडकरींची मानहानी करण्याचा हेतू नाही

ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रवीण महाजन याचा एक मेसेज आणखी व्हायरल झाला आहे. माझ्याकडून चुकीने आमदार समीर कुणावार यांच्यासोबत केलेल्या संभाषणाची ऑडीओ व्हायरल झाली. माझा याबाबत मंत्री नितीन गडकरींची मानहानी करण्याचा हेतू नव्हता. मला असे करावे का? असा विचार माझ्या मनात आला होता. म्हणून मी आमदार कुणावार यांना फोन केला होता. असं काही करण्याचा उद्देश नव्हता आणि नाही. यासाठी मी खुलासा करत असून काही लोकांच्या मनात गैरसमज असतील तर मला माफ करा, असा मेसेज महाजन यांच्या नावाने व्हायरल झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -