Saturday, May 11, 2024
HomeदेशIndian Economy : जगात भारताची पत काय?

Indian Economy : जगात भारताची पत काय?

युरोपला मागे टाकत चीनलाही भारत घाम फोडणार!

बनणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : जगात भारताची पत काय आहे हे अर्थव्यवस्थेतील काहीही ओ का ठो न कळणारी उद्धव ठाकरेंसारखी माणसे जेव्हा बोलतात, तेव्हा हसायला येते. विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणे किंवा सोशल मीडिया बघून आपला समज बनवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपला मागे टाकत देशाची केलेली भरभराट पहाता (Indian Economy) चीनलाही घाम फुटला आहे.

कोरोना महामारीनंतर जागतिक पटलावर अनेक समीकरणं बदलली. रशिया-युक्रेन युद्ध गेल्या १९ महिन्यांपासून सुरु आहे. आता इस्त्राईल-हमास युद्धाने जगाला वेठीस धरले आहे. पण या काळात भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) तुफान वेगाने घौडदौड करत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला अजूनही सावरता आलेले नाही. उलट चीनची अवस्था अजून वाईट होण्याची भीती आहे. हा घटनाक्रम भारताच्या पथ्यावर पडत आहे.

S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंगने (IMF) जारी केलेल्या नवीन पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) अहवालात असे म्हटले आहे की, कोरोनानंतरच्या काळात भारताने सर्वच क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. २०२१ आणि २०२२ या वर्षात सलग दोन वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे आणि यामध्ये चालू आर्थिक वर्ष २०२३ मध्येही भारताची चांगल्या वाढीसह वेगाने घौडदौड पुढे सुरू आहे.

सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, परंतु २०३० पर्यंत जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि IMF पासून जागतिक बँकेपर्यंत सर्व जागतिक एजन्सींनी देशाप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे.

भारतावर विश्वास व्यक्त करताना, ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंगने आपल्या अहवालात म्हटले आहे की, येत्या सात वर्षांत देश चांगली कामगिरी करेल आणि २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.

२०३० पर्यंत भारताचा जीडीपी ७,३०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि जपानचा जीडीपी मागे राहील. ग्लोबल इंडियाच्या मते, भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ६.२ टक्के ते ६.३ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात, मार्च २०२४ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील.

ग्लोबलच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची सातत्याने वाढ होणे अपेक्षित आहे आणि या वाढीमध्ये सर्वात मोठे योगदान देशांतर्गत मागणी असेल. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सध्या जीडीपीच्या दृष्टीने पाहिले तर अमेरिका ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर चीन आणि जपानचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशांपेक्षा मोठा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -